Temperature sakal
देश

Winter : यंदाचा हिवाळा ऊबदार, सरासरी तापमान वाढणार; चीनमधील संशोधकांचा अंदाज

अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस, तापमानात फारशी न होणारी घट यामुळे डिसेंबरमध्येही थंडीची तीव्रता जाणवत नसल्याचा अनुभव आहे.

पीटीआय

नवी दिल्ली - अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस, तापमानात फारशी न होणारी घट यामुळे डिसेंबरमध्येही थंडीची तीव्रता जाणवत नसल्याचा अनुभव आहे. संशोधकांनी या हवामानाची पुष्टी केली आहे. २०२३-२४ मधील हिवाळ्यात भूपृष्ठाच्या जागतिक सरासरी तापमानाचा ऐतिहासिक विक्रम होण्याची ९५ टक्के शक्यता असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

त्यामुळे, हिवाळ्यात तापमान अधिक राहून तो तुलनेने ऊबदार राहण्याचा अंदाज आहे. एल निनोमुळे हवामानात हे बदल होत आहेत. ‘ॲडव्हान्सेस इन ॲटमॉसफेरिक सायन्सेस’या नियतकालिकात यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

चीनमधील चायनीज अकादमी ऑफ सायन्सेसमधील इन्स्टिट्यूट ऑफ ॲटमॉसफेरिक फिजिक्समधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. युरेशियातील (युरोप आणि आशिया) कमी ते मध्यम उंचीवरील प्रदेश तसेच अमेरिकेच्या बहुतेक भागाला अपवादात्मक ऊबदार हिवाळ्याचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे.

जागतिक तापमानवाढीच्या आगीत एल निनोचे तेल

यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा अनुभवल्यानंतर आता सर्वाधिक उष्ण हिवाळ्याचाही जगाला सामना करावा लागेल, याची चिंता संशोधकांना भेडसावत आहे. या वर्षी महासागरे आणि जमिनीवर सातत्याने जागतिक तापमान वाढत असल्याचा कल होता.

जून ते ऑक्टोबर २०२३ मधील जागतिक सरासरी तापमान १९९१ ते २००० मधील सरासरी तापमानापेक्षा ०.५७ अंश सेल्सिअसने अधिक होते. जागतिक तापमानवाढीत सक्रिय झालेल्या एल निनोने जणू आगीत तेल ओतले. त्याचा जगभरातील हिवाळ्यावर सर्वदूर परिणाम होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT