राकेश टिकैत
राकेश टिकैत राकेश टिकैत
देश

राकेश टिकैत यांना ठार मारण्याची धमकी; कुटुंबाला शिवीगाळ

सकाळ डिजिटल टीम

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांना रविवारी (ता. २७) फोन करून युवकाने अपशब्द वापरून ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली आहे. युवकाने आपले नाव संजू सांगितले.

सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनचे एसएसआय राकेश शर्मा यांनी राकेश टिकैत यांच्या सर्क्युलर रोडवरील निवासस्थानी पोहोचून या प्रकरणाची चौकशी केली. पोलिसांनी धमकीचा मोबाईल क्रमांक पाळत ठेवून तपास सुरू केला आहे. या संदर्भात रामपुरी येथील रहिवासी प्रज्वल त्यागी यांच्यावतीने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस स्टेशन प्रभारी बिजेंद्र सिंह रावत यांनी सांगितले.

अज्ञात व्यक्तीने कुटुंबाला शिवीगाळही केली. १३ महिन्यांत शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान (Farmers agitation) अनेक वेळा धमक्या देण्यात आल्या होत्या. याची गाझियाबाद पोलिसांकडे तक्रार केली होती. काहींवर गुन्हे दाखल झाले, तर काही ठिकाणी तपास झाला. मात्र, आरोपींना अटक झाली नाही.

मुझफ्फरनगरमध्येही याआधी एका प्रकरणात धमकावल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती, मात्र कारवाई झाली नाही. आता पुन्हा धमकी मिळाल्यानंतर अहवाल नोंदवला असला तरी कारवाईची प्रतीक्षा आहे. यापूर्वीच्या तक्रारींवर कारवाई करून आरोपींना अटक केली असती, तर अशा धमक्या थांबल्या असत्या, असे राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी सांगितले.

पोलिस तपास करीत आहेत

राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांना धमकी दिल्याच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत, असे मुझफ्फरनगरचे एसएसपी अभिषेक यादव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT