देश

अमेठीतील भाजप कार्यकर्त्याच्या हत्येसंबंधी तिघांना अटक

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेश : अमेठीतील स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंग यांची हत्या करणाऱ्या पाच संशयितांपैकी तिघांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली असून दोन संशयित फरार आहेत. 

उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, मिळालेल्या पुराव्यांनुसार हत्या करणारे आरोपी हे स्थानिक असून राजकीय वादातून ही हत्या करण्यात आली होती. पाच जणांवर संशय असून त्यापैकी तीन जण अटकेत आहेत, तर इतर दोन संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. 

सुरेंद्र सिंग हे बरौलिया गावचे प्रमुख होते. तसेच ते स्मृती इराणी यांचे विश्वासू कार्यकर्ते होते. त्यांची शनिवारी (ता. 25) रात्री घरात घुसून हत्या करण्यात आली होती. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सुरेंद्र सिंग यांनी अमेठी मतदार संघात स्मृती इराणी यांचा प्रचार केला होता. या मतदार संघातून स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना पराभूत केले. सुरेंद्र सिंग यांचे मारेकरी पाताळात लपले तरी त्यांना शोधून काढू, असे स्मृती इराणी यांनी रविवारी (ता. 26) म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT