Minister Ramalinga Reddy
Minister Ramalinga Reddy esakal
देश

ST कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! परिवहन महामंडळ 'इतक्या' कोटींचं विमा संरक्षण देणार; KSRTC चा देशातला पहिला उपक्रम

सकाळ डिजिटल टीम

कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी महामंडळाने राबवलेली ही अपघात नुकसानभरपाई विमा योजना अतिशय चांगली आहे.

बंगळूर : कामगार कल्याणाच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत (Kamgar Kalyan Yojana) आपल्या कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपये विमा संरक्षण देणारे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ (KSRTC) हे देशातील पहिले महामंडळ असल्याची माहिती परिवहनमंत्री रामलिंगारेड्डी यांनी दिली.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन चालकांच्या कुटुंबीयांच्या वारसदारांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा अपघात नुकसानभरपाईचे धनादेश वितरित केल्यानंतर ते बोलत होते. (Karnataka State Transport Corporation)

ते म्हणाले, ‘‘या योजनेत स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ५० लाखांचा प्रीमियरहीत विमा आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्सकडून वार्षिक ८८५ रुपये प्रीमियम भरल्यावर (कर्मचाऱ्यांद्वारे) ५० लाखांचा विमा संरक्षित केला जाईल. या योजनेंतर्गत ही विमा सुविधा कर्मचारी कर्तव्यावर नसताना होणाऱ्या अपघातांनाही लागू आहे.’’

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जी. व्ही. चलपथी यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईचा धनादेश देण्यात आला आहे. त्यांचा २९ जानेवारी आणि पी. एन. नागराज यांचा एक फेब्रुवारी रोजी अपघाती मृत्यू झाला होता. मृत चालकांना परत आणता येत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी महामंडळाने राबवलेली ही अपघात नुकसानभरपाई विमा योजना अतिशय चांगली आहे.

ही योजना इतर रस्ते वाहतूक संस्थांमध्येही लागू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली. मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी कुटुंबाने पैसे बँकेत मुदत ठेवीमध्ये ठेवावेत. दोन्ही कुटुंबीयांच्या मुलांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे.

यावेळी केएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. अनबुकुमार, एसबीआय बँकेचे व्यवस्थापक आणि कामगार संघटनांचे नेते एच. व्ही. अनंथा सुब्बाराव, बी. जयदेवराजे अरसू, जी. एस. महादेवय्या, एच. डी. रेवाप्पा, एस. नागराज, व्यंकटरमणप्पा आदी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT