Treatment of stepmother to Assam by previous government Modi targets Congress 
देश

आधीच्या सरकारकडून आसामला सावत्रपणाची वागणूक; मोदींचा काँग्रेसवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

या आधीच्या सरकारने आसामच्या उत्तरेकडील प्रदेशाला सावत्रपणाची वागणूक दिली त्यामुळे हा भाग अनेक सोयी-सुविधांपासून वंचित राहिला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मोदींच्या हस्ते धेमजी येथे ३ हजार ३०० कोटी रुपयांच्या तीन बड्या पेट्रोलियम प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रदेशाच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार अधिक समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर ज्यांनी अनेक दशके या देशावर राज्य केले त्या मंडळींना दिल्लीपासून दिसपूर हे खूप दूर आहे असे वाटत होते. आता दिल्ली फार दूर राहिली नसून ती तुमच्या दारातच आहे. या आधीच्या सरकारने आसामच्या उत्तरेकडील प्रदेशाला सावत्र आईची वागणूक दिली त्यामुळे हा भाग आरोग्य सेवा, शिक्षण आणि उद्योग आदींपासून वंचित राहिला" आताही निवडणुकीच्या आधी जसे शक्य होईल तसे आपण आसाम आणि अन्य राज्यांना भेट देऊ असे आश्‍वासन मोदींनी यावेळी दिले.

दरम्यान, राज्यामध्ये गायींना मारणारी एक मोठी टोळी असून त्याला राज्य सरकारचेच संरक्षण असल्याचा आरोप मेनका गांधी यांनी केला होता. या आरोपाबाबत पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे, आसाम तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे, अशी मागणी आसाममधील काँग्रेस नेते भूपेश बगेल यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: What a Catch! शुभमन गिलचा श्रीलंकेला स्तब्ध करणारा झेल, भारताच्या फिरकीसमोर यजमान फेल! Video Viral

Loggerhead Turtle: अरबी समुद्रातून १०० किलो वजनाच्या दुर्मिळ 'लॉगरहेड' कासवाची सुटका

Pune Bengaluru Highway : पुणे-बंगळूर 'ग्रीनफिल्ड हाय-वे' अधांतरी! गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट रखडला? महामार्गाचे रेखांकनही थांबवले, PM कार्यालयाकडून मान्यता का नाही?

पदवीदान सोहळ्याला जायचा प्रश्नच नाही; NALSARच्या निमंत्रणावर CJI सूर्यकांत यांची प्रतिक्रिया

Marathi News Live Updates : दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या भोंदूबाबावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा; आरोपी फरार

SCROLL FOR NEXT