the tweet before suicide Bhauyyuji Maharaj
the tweet before suicide Bhauyyuji Maharaj 
देश

मृत्यूपूर्वी काही तास आधी भैय्यूजी महाराज होते टि्वटरवर 'अॅक्टिव्ह'

वृत्तसंस्था

पुणे : अध्यात्मिक गुरु भैय्यूजी महाराज यांनी आज दुपारी इंदूरमध्ये गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी काही तास ते ट्विटरवर अॅक्टिव्ह होते. आपल्या अखेरच्या म्हणजे मृत्यूपूर्वीच्या एक तास अगोदर त्यांनी मासिक शिवरात्रीचे महत्त्व सांगत भक्तांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे पुढच्या एका तासात असे काय घडले की भैय्यूजी महाराजांना आत्महत्या करावी लागली हा प्रश्न समोर येतो आहे. 

केवळ 48 वर्षांच्या भैय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येने त्यांच्या शिष्यगणांना धक्का बसला. काही महिन्यांपूर्वीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी भैय्यूजी महाराजांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. आपल्यावर गोळी झाडून घेण्यापूर्वी भैय्यूजी महाराजांनी सुमारे तासभर आधी ट्विट करुन मासिक शिवरात्रीची माहिती दिली होती. या ट्विटमध्ये त्यांनी जे छायाचित्र जोडले आहे.

त्यात त्यांनी भगवान शंकराला मृत्युंजयमहादेव त्राहिमांशरणागतमI जन्ममृत्यूजराव्याधिपीडति: कर्मबन्धन II या श्लोकाद्वारे वंदन केले होते. 

त्यापूर्वीही काही काळ ट्विटरवरुन त्यांनी संस्कृत पंडित गोपिनाथ कविराज यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीही अर्पण केली. त्याच्या आधी तेलुगू कवी सिंगीरेड्डी नारायण रेड्डी यांनाही पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. तसेच केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारेही ट्विट त्यांनी केले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT