डॉ. मोहन भागवत  e sakal
देश

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाउंटवरील ब्ल्यू टीक हटवलं

भाग्यश्री राऊत

नागपूर : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने (twitter) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)बाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS chief mohan bhagawat) यांच्या ट्विटर अकाउंटवरील ब्लू टीक (twitter romoves blue tick ) हटविण्यात आलं आहे. दुसरीकडे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाउंटवरील ब्लू टीक हटविण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासून देशात वादळ निर्माण झालं होतं. त्यातच आता सरसंघचालकांच्या ट्विटर अकाउंटवरून ही टीक हटविल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. (twitter removes blue tick of RSS chief mohan bhagawat twitter account)

मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाउंटवरील ब्ल्यू टीक हटवलं

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मे २०१९ मध्ये ट्विटरवर अकाउंट उघडलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी एकही ट्विट केलेलं नाही. त्यामुळेच ट्विटरने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. कारण ट्विटरच्या नियमानुसार सहा महिने कोणी अ‌ॅक्टीव्ह नसेल तर त्यांच्या अकाउंटवर कारवाइ केली जाते. पण, ब्ल्यू टीक म्हणजे फक्त ट्विटरवर अ‌ॅक्टीव्ह असणे असा त्याचा अर्थ नाही, तर व्हेरिफाइड अकाउंट असा ब्ल्यू टीकचा अर्थ होतो. ते ब्लू टीक मोठ्या व्यक्तींना दिले जाते. पण, ट्विटरच्या अटी आणि नियमांनुसार जर कोणी हँडलचं नाव बदललं तर ब्लू टिक हटवलं जाते. तसंच एखादं अकाउंट सक्रिय नसेल, अपडेट नसेल्यास अनव्हेरिफाइड केलं जातं. तसंच ज्या कारणासाठी अकाउंट व्हेरिफाय केलं होतं ते राहिलं नसेल तर अकाउंट अनव्हेरिफाइड करण्यात येतं. समजा एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण करत नसल्यास ब्लू टिक हटवली जाते.

देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या ट्विटरवरून हटवलं होतं ब्ल्यू टीक -

ट्विटरने देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे ट्विटर अकाउंट काही तासांसाठी अनव्हेरिफाइड केलं होतं. उपराष्ट्रपतींच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिक हटवण्यात आली होती. उपराष्ट्रपतींच्या ट्विटरची ब्लू टिक हटवल्याचं निदर्शनास आल्यानंतर अनेकांनी राग व्यक्त केला होता. सरकारनेही याबाबत ट्विटरवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता हे ब्लू टीक पुन्हा देण्यात आलं आहे.

ट्विटर इंडिया आणि भारत सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासूनच वाद सुरु आहे. सरकारने लागू केलेल्या नव्या आयटी नियमांवरुन हा सगळा वाद सुरु होता. त्या पार्श्वभूमीवरच घडलेल्या घटनेमुळे आणखीनच वाद ताणला जाण्याची शक्यता आहे. मात्र, ट्विटरने आता सारवासारव करुन आपली चूक पुन्हा दुरुस्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT