Two Indian army soldiers died
Two Indian army soldiers died 
देश

रणगाड्याची तोफ फुटल्याने दोन जवानांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : युद्धाभ्यासादरम्यान रणगाड्याची तोफ फुटल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन जवानांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी झांसीच्या बबीना छावणीच्या गोळीबार मैदानात घडली. या वेळी अन्य जवान जखमी झाला आहे. मृत जवान राजस्थान आणि पश्‍चिम बंगालचे असून जखमी जवान उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.

बबीना छावणीच्या गोळीबार मैदानात काल रात्री युद्धसराव सुरू होता. टी-९० रणगाड्यात तीन जवान होते. जवानांनी तोफगोळा डागला. तोफेतून गोळा बाहेर गेला खरा परंतु दारू तोफेतच राहिली. त्यामुळे गोळ्याला डागणारी दारू फुटल्याने तीन जवान भाजले. जखमी जवानांना तत्काळ लष्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात दोन जवानांचा मृत्यू झाला तर रणगाडयाचा चालकाची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सुमेर सिंह (रा. राजस्थान) आणि सुकांता मंडल (रा. पश्‍चिम बंगाल) असे मृत जवानांची नावे सांगितली जात आहेत. प्रदिप सिंह यादव (रा. उत्तर प्रदेश) हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले असून तोफ कशी काय फुटली? जवानांना पुरेशी सुरक्षा होती की नाही? याची चौकशी केली जाणार आहे.

२७०० एकरावरची छावणी

बबीना छावणीतील गोळीबार मैदान झांसीपासून एक किलोमीटर अंतरावर आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत बबीना छावणी तयार करण्यात आली होती. तत्कालीन काळात ब्रिटिश सैनिकांसाठी तळ म्हणून त्याचा वापर केला जात होता. आशिया खंडातील सर्वात मोठे लष्करी तळ म्हणून बबनीना छावणी ओळखली जाते. ही छावणी २७४९ एकरावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT