देश

सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार 

पीटीआय

श्रीनगर : लष्कराचे मेजर सतीश दहिया यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्या लष्करे तैयबाच्या एका दहशतवाद्यासह दोघे दहशतवादी आज सोपोरमधील चकमकीत ठार झाले. अबू माझ असे या लष्करे तैयबाच्या दहशतवाद्याचे नाव असून, त्याच्यासह अब्दुल माजिद ऊर्फ समीर हा दहशतवादीही मारला गेला आहे. 

जम्मू-काश्‍मिरातील दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांनी मोहीम तीव्र केली असून, गेल्या बारा दिवसांत 18 दहशतवादी ठार झाले आहेत. पाकिस्तानी वंशाचा अबू माझ 2005 पासून दहशतवादी कारवाया करीत होता आणि तो सोपोरमधील बोमाई येथील रहिवासी होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोपोरजवळील नौपारा येथे दहशतवादी आल्याची माहिती मिळताच लष्कर आणि निमलष्करी दलांनी काल रात्रीपासूनच शोध सुरू केला होता. दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करताच चकमक सुरू झाली आणि त्यात दोघे दहशतवादी ठार झाले.

हंडवाडामध्ये लष्कराच्या ताफ्यावर गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यात माझ याचा हात होता. या हल्ल्यात तीन दहशतवादी मारले गेले; पण अबू माझ फरार झाला होता. हल्ल्यात मेजर सतीश दहिया हुतात्मा झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT