देश

देशातील सर्व विद्यापीठांमध्ये जागतिक योग दिन सक्तीचा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम सर्व विद्यापीठांमध्ये सक्तीचा करण्यात आला आहे. येत्या 21 जूनला (शुक्रवार) आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील सर्व कुलगुरूंना पत्र लिहून स्पष्ट निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमाला विद्यापीठांच्या कक्षेतील सर्व महाविद्यालयांचे कर्मचारी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती असावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळी सात ते आठ या वेळेत योग दिनाचा सरकारी कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. 
योगदिनी ओंकाराचा उच्चार करण्याबाबत मुस्लिम विद्यार्थी संघटनांनी पहिल्यापासूनच विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर "यूजीसी'च्या ताज्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत उत्सुकता आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाच्या पार्श्‍वभूमीवर यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये स्वतःचा ताडासन करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता, तसेच योगाचे शारीरिक तंदुरुस्तीसाठीचे फायदे अधोरेखित केले होते. यंदाच्या योग दिनासाठी झारखंडची राजधानी रांची हे शहर केंद्राने निवडले आहे. तेथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमास मोदी स्वतः उपस्थित राहून योगासने करतील. "यूजीसी'ने दिलेल्या निर्देशांत म्हटले आहे की, योगदिनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना योग करण्यासाठी प्रोत्साहित करावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT