Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Pratik Gandhi is working with Harry Potter star in upcoming series : अभिनेता प्रतीक गांधी हंसल मेहता यांच्या आगामी वेबसिरीजमध्ये एका गाजलेल्या हॉलिवूड स्टारबरोबर काम करतोय. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.
Pratik Gandhi is working with this famous Hollywood star
Pratik Gandhi is working with this famous Hollywood star

Pratik Gandhi : 'स्कॅम 1992' या वेबसिरीजमुळे अभिनेता प्रतीक गांधीला खूप प्रसिद्धी मिळाली. या सीरिजनंतर त्याच्यासाठी सिनेसृष्टीचे दरवाजे खऱ्या अर्थाने खुले झाले. प्रतीक सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम करतोय.

आता प्रतीकला एक मोठी संधी मिळाली आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या एका बिग बजेट प्रोजेक्टमध्ये प्रतीक काम करतोय.

प्रतीक हंसल मेहता यांच्या आगामी 'गांधी' या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेब सिरीजमध्ये काम करतोय आणि या वेबसिरीजमध्ये प्रतीक बरोबर अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार काम करत आहेत. या सिरीजमध्ये 'हॅरी पॉटर' फेम अभिनेता टॉम फेल्टनही प्रतीक बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

नुकतंच हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत टॉम या वेबसिरीजमध्ये काम करत असल्याची घोषणा केली. या सोबतच या सिरीजमध्ये लिबी मेई, मॉली राईट, राल्फ एड्नेयी, जेम्स मुरे, लिंडेन अलेक्सझांडर, जॉन्नो डेव्हिस आणि सिमॉन लिनन हे कलाकार काम करणार असल्याचं जाहीर केलं.

टॉमने 'हॅरी पॉटर' सिरीजमध्ये साकारलेली 'ड्रॅको मॅल्फॉय' ही भूमिका खूप गाजली होती. हॅरी पॉटरवर जळणारा ड्रॅको सगळ्यांनाच खूप आवडला होता आणि या गाजलेल्या स्टार सोबत काम करण्याची संधी प्रतीकला मिळणार आहे. याबाबतच्या भावना प्रतीकने एका मुलाखतीमध्ये शेअर केल्या.

काय म्हणाला प्रतीक?

नुकतंच हिंदुस्थान टाइम्सला प्रतीकने मुलाखत दिली. तो म्हणाला, " या वेबसिरीजमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार काम करणार आहेत हे कळल्यावर मी खूप आनंदी आहे. मी जून-जुलै दरम्यान सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला जाणार आहे. मी वेबसिरीजमध्ये संपूर्ण टीमला भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. हा खूप मजेशीर आणि खूप काही शिकवणारा अनुभव असेल असं मला वाटतं."

पुढे तो म्हणाला," गांधी वेबसिरीजचा आतापर्यंतचा प्रवास खूप मजेशीर आहे. टॉम आणि इतर कलाकारांसोबत काम करताना पहिल्यांदाच मी आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव घेईन. या मुळे मला ही जाणीव झालीये कि माझा हा प्रवास मला खूप काही शिकवणारा होता. टॉम हा जागतिक दर्जाचा कलाकार आहे आणि त्याच्या या वेबसिरीजमध्ये काम करण्याच्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे. गांधी हा खूप उत्तम विषय आहे आणि अशा प्रकारचे कलाकार या वेबसिरीजशी जोडले गेल्यावर हा प्रोजेक्ट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटत. आंतरराष्ट्रीय कलाकार या सिरीजशी जोडले गेल्यामुळे या सिरीजमध्ये आणखी खरेपणा येईल."

Pratik Gandhi is working with this famous Hollywood star
Scam 2003 Teaser: हर्षद मेहताच्या Scam 1992 नंतर अब्दुल करीम तेलगीचा घोटाळा येणार उघडकीस, पाहा टीझर

प्रतीक या सिनेमात राष्ट्रपिता महात्मा गांधींची भूमिका साकारतोय. फेब्रुवारीमध्ये या सिरीजचं शूटिंग सुरु झालं असून आतापर्यंत प्रतीकने मुंबई आणि गुजरातमधील काही भागात या सिरीजचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे आणि आता तो लवकरच लंडनला उर्वरित शूटिंग पूर्ण करण्यासाठी जाणार आहे. २०२५ मध्ये ही वेबसिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Pratik Gandhi is working with this famous Hollywood star
Do Aur Do Pyaar Trailer: एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची गोष्ट; विद्या बालन आणि प्रतीक गांधीच्या ‘दो और दो प्यार’चा ट्रेलर पाहिलात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com