google
देश

ब्रिटनचे PM बोरिस जॉन्सन आजपासून भारत दौऱ्यावर, गुजरातमधून सुरुवात

या भेटीमुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील, अशी चर्चा सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. उद्या 22 एप्रिलला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील, अशी चर्चा सुरु आहे. पंतप्रधान जॉन्सन आज गुजरातमधून दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. अहमदाबाद येथील उद्योजकांसोबत ते आज चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन यांच्यातील शेवटची भेट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्लासगो शिखर परिषदेदरम्यान झाली होती.

या भेटीत व्यापार हा विषय मुख्य पटलावर असणार आहे. यापूर्वी मे 2021 मध्ये दोन्ही नेत्यांमध्ये आभासी बैठक झाली होती मात्र त्यावेळी 2030 च्या रोडमॅपवर चर्चा झाली होती. हा रोडमॅप आरोग्य, हवामान, व्यापार, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्रातील यूके-भारत संबंधांसाठी एक फ्रेमवर्क प्रदान करत होता. गेल्या वर्षी पंतप्रधान जॉन्सन यांचा भारत दौरा दोनदा रद्द करण्यात आला होता. जानेवारीत ते पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र त्यावेळी देशातील कोरोना संकटामुळे हा दौरा शक्य झाला नाही. यानंतर एप्रिलमध्येही कोरोना संकटामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता.

G-7 चे अध्यक्ष या नात्याने ब्रिटनने पंतप्रधान मोदींना निमंत्रण दिले होते, पण कोरोना संकटामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा होऊ शकला नाही. 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्यावर सहमती दर्शवण्यात आली आहे. मे 2021 मध्ये दोन्ही व्हर्चुअल बैठक झाली होती. ज्यात 2030 च्या रोडमॅपवर चर्चा झाली. यामध्ये आरोग्य, हवामान, व्यापार, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्रातील ब्रिटन-भारत संबंधनावर (India- UK relations) चर्चा झाली. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांमध्ये 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्यावर सहमती दर्शवली आहे. दरम्यान, पुढील 15 दिवसांत भारत आणि ब्रिटनमध्ये अनेक उच्चस्तरीय कार्यक्रम होणार आहेत.

भारत दौऱ्यापूर्वी जॉनसन पुन्हा एकदा वादात सापडले असून विरोधक पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मिळालेल्या रिपोर्टनुसार, बोरिस जॉनसन यांच्यावर पुन्हा एकदा पार्टी प्रकरणातील आणखी एका आरोपांवरून विरोधकांनी निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT