Indian Student Stranded Ukraine e sakal
देश

'रशियन सैनिक भारतीय विद्यार्थिनींना घेऊन गेलेत', भारतीय विद्यार्थिनीची आपबीती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सातव्या दिवशीही युक्रेन-रशियामधील युद्ध (Ukraine Russia War) सुरूच आहे. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या १२ हजार भारतीयांना (Indian Student Stranded Ukraine) आतापर्यंत मायदेशी परत आणलंय. पण, अद्यापही ८ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. यापैकी युक्रेनमध्ये अडकलेल्या लखनौच्या विद्यार्थिनीने तिची आपबीती सांगितली. रशियन सैनिक फक्त भारतीय विद्यार्थिनींना घेऊन गेलेत, असं तिनं सांगितलं.

''आम्ही राहतोय तिथं...''

युक्रेनमध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेशातील लखनौच्या एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ काँग्रेसने ट्विट केला आहे. यामध्ये ती विद्यार्थिनी सांगतेय, ''आम्ही कीव्हमध्ये अडकलो आहेत. चारही बाजूने रशियाने घेरलेलं आहे. इथे आम्हाला कोणीही मदत करत नाही. आता मदत मिळण्याची आशा देखील नाही. कारण, आम्ही दूतावासांना फोन करतोय. पण ते फोन उचलत नाहीत. आम्ही जिथं राहतोय तिथं खूप सारे लोक येतात. दरवाजा तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात.''

''रशियन सैनिक भारतीय विद्यार्थिनींना घेऊन गेलेत'' -

आम्ही इथून रेल्वे किंवा जे वाहन मिळेल त्याने निघण्याचा विचार केला. पण, आमच्या आधी काही विद्यार्थी कॅबने कीव्हमधून निघाले. त्यांना रशियन सैनिकांनी रोखलं. गोळीबार केला. त्यांच्यासोबत असलेल्या भारतीय विद्यार्थिनींना घेऊन रशियन सैनिक निघून गेले. त्यांना कुठे घेऊन गेलेत हे माहिती नाही, असंही या विद्यार्थिनीनं सांगितलं.

भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू -

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या गुरुवारी अचानक युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले. त्यानंतर परिस्थिती अनियंत्रित झाली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत येण्याचे रस्ते बंद झालेत. शेवटी सरकारने रोमानिया आणि पोलंडमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे ठरवले. ऑपरेशन गंगा मोहिमेद्वारे आतापर्यंत १२ हजार विद्यार्थ्यांना मायदेशी आणल्याचे सरकारने सांगितले आहे. पण, अद्यापही ८ हजार भारतीय अडकून पडले आहेत. मंगळवारी एका भारतीय विद्यार्थ्याचा खारकीव्ह येथे गोळीबारात मृत्यू झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली असून आमच्या पाल्यांना लवकरात लवकर माघारी आणण्याची विनंती ते करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, बैठकांना सुरुवात; 'हे' 5 मुद्दे गाजणार

रेल्वे पुनर्वसन प्रकल्पासाठी जागा मोकळी करणे आवश्यक; गणेश नगर-मेघवाडी कारवाईवर DRP चं स्पष्टीकरण

Mrunal Thakur Yashasvi Jaiswal Dating Rumours: यशस्वी जैस्वालसोबत डेटिंगच्या चर्चांवर मृणाल ठाकूरचं मौन अखेर तुटलं; म्हणाली, “Gen Z...”

Solar Scheme Scam: पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या नावाखाली १२ लाखांहून अधिकांची फसवणूक; राजेंद्र बोहाडेवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गोकुळकडून दूध उत्पादकांना मोठा दिलासा; म्हैस अन् गाय दूध खरेदी दरात वाढ

SCROLL FOR NEXT