RSS
RSS 
देश

युक्रेन-रशिया वादात RSSची उडी; म्हणाले, 'या युद्धात संघाचे...'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी केंद्र सरकारने रशियावरील दबाव वाढविण्यासाठी अन्य देशांशी हातमिळवणी करावी असे म्हटले आहे. युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईला रा.स्व.संघाने विरोध दर्शविला आहे. युद्धाने कोणत्याही प्रश्नाचे समाधान होत नाही तर मानवतेचे नुकसानच होते. (Russia-Ukraine War)

पुतीन यांनी हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवावा म्हणून जागतिक नेते, राजनैतिक अधिकारी आणि सिव्हिल सोसायटी यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे इंद्रेशकुमार यांनी नमूद केले. पुतीन यांनीही तातडीने हे युद्ध थांबवून चर्चेच्या माध्यमातून हा तिढा सोडवावा असे त्यांनी नमूद केले. भारताला आज शांततेची गरज असून युद्धाला खतपाणी घालेल अशी कोणतीही स्थिती निर्माण होता कामा नये. युद्धाचे परिणाम हे अत्यंत भयावह असतात असे त्यांनी नमूद केले.

रशियाने युद्धखोरीचा मार्ग सोडून शांततेच्या मार्गावर चालावे म्हणून मुस्लिम आणि ख्रिश्चन धार्मिक नेत्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. युद्धाने कोणतीही समस्या सुटत नाही, युद्धामध्ये हजारो लोकांचा जीव जातो, लाखो बेघर होतात आणि कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची हानी होते, असे इंद्रेशकुमार यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT