dr harsh vardan 
देश

केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणतात,'भारतात कोरोनाचे जवळपास 8 लाख रुग्ण ही चिंतेची बाब नाही'

सूरज

नवी दिल्ली - भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या आठ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. तरीही ही बाब चिंता करण्यासारखी नाही असं सरकारने म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन म्हणाले की, देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे मृत्यू दर खूप कमी आहे. यामुळेच कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंता कऱण्यासारखी नसल्याचं त्यांनी सांगितलं. देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीकडे पाहिले असता कम्युनिटी ट्रान्समिशनची भीती व्यक्त केली जात असली तरी असं काही नसल्याचं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितलं की, कोरोनाच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 63 टक्के इतके आहे. तर मृत्यू दर फक्त 2.72 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावची काळजी करण्याची गरज नाही. सरकारने कोरोनाचे टेस्टिंग वाढवलं आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्ण ओळखता येतात आणि त्यांच्यावर लगेच उपचार करता येतो. देशत दररोज जवळपास 2.7 लाख कोरोनाच्या टेस्ट केल्या जात आहेत. भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झालेलं नाही. मात्र काही ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे असे डॉक्टर हर्ष वर्धन म्हणाले. 

हे वाचा -खूशखबर ! सिप्लाने आणलंय कोरोनावरील सर्वात स्वस्त औषध

गेल्या 24 तासात भारतात आतापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले. एका दिवसात 26 हजार 506 जण पॉझिटिव्ह आढळले. यासह देशातील कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 93 हजार 802 इतकी झाली आहे. एका तर दिवसभरात 475 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे एकूण 21 हजार 604 जणांचा मृत्यू झाला. भारतात आतापर्यंत 1.1 कोटीहून अधिक कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत.

दिल्ली बार कौन्सिलचे ५०० कोटी 
दिल्ली बार कौन्सिलने आज कोविड-१९ पंतप्रधान केअर्स निधीसाठी ५०० कोटी रुपयांची मदत दिली आहे. हा निधी कोरोना लॉकडाउनमुळे व न्यायालये बंद असल्याने आर्थिक स्थिती बिकट झालेल्या वकिलांसाठीची वापरावा अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT