'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

SHAH RUKH KHAN WIPES HIS FACE WITH MANAGER POOJA DADLANI’S DUPATTA: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान २१ सप्टेंबर रोजी मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान आणि मॅनेजर पूजा ददलानी उपस्थित होत्या.
VIRAL VIDEO

SHAH RUKH KHAN VIRAL VIDEO

esakal

Updated on

SHAH RUKH KHAN LALBAUGCHA RAJA DARSHAN VIRAL VIDEO 2026: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. किंग खानची गणपती बाप्पांवर खूप श्रद्धा आहे. दरम्यान अशातच तो मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी सुद्धा उपस्थित होती. दरम्यान शाहरुखचे लालबागच्या राजाच्या दर्शनावेळीचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. परंतु यावेळी शाहरुखच्या एका कृतीमुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com