ramdas athawale
ramdas athawale 
देश

आठवले म्हणाले, राहुल को लग गयी है चाहूल... (व्हिडिओ)

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कवीता हटके असतात हे सर्वांनाच माहित असून, संसदेत आठवले यांनी केलेली कवितेमुळे वातावरण एकदम हलके झाले अन् सर्वांनाच हसू फुटले. आठवले यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रामदास आठवले त्यांच्या कवितांसाठी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर प्रसिद्ध असून, त्यांच्या या कवितांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. नेटिझन्सच्या पसंतीस पडत असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला प्रत्येक मंत्री आपल्या भाषणातून प्रतिसाद देत होते. एकामागोमाग एक भाषणे होत असल्यामुळे सभागृहातले खासदार कंटाळले होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. अनेक खासदार पेंगुळले होते. अशावेळी आठवले उभे राहिले अन् म्हणाले, राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल, असे आठवले यांनी म्हणताच सभागृहात तुफान हशा पिकला. आठवले यांची कविता ऐकून मोदींनाही हसू आवरले नाही.

आठवले यांनी त्यांच्या कवितेतून मोदींचे तोंडभरुन कौतुक करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह विरोधकांवर तोंडसुख घेतले. आठवलेंच्या कविता त्यांच्या अनोख्या यमकासाठी प्रसिद्ध आहेत. आठवले यांनी अनेकदा संसदेत भाषणादरम्यान कविता सादर केल्या असून, त्या व्हायरल झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT