देश

आधी भाजप प्रवेश, नंतर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता नेत्यांच्या पक्षांतराला जोर आला आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानतंर आज आणखी एक माजी आमदार प्रमोद गुप्ता आणि काँग्रेस नेत्या प्रियांका मौर्य यांनी भाजपमध्ये एंट्री केली. त्यातच आता काँग्रेसला रायबरेलीत धक्का बसला आहे. रायबरेलीच्या आमदार आदिती सिंह यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

आदिती सिहं यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की,'मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारण्यात यावा.' याआधीच आदिती सिंह यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्यात फक्त एकच शब्द लिहिला होता. सब्र.

आदिती सिंह यांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता. विधानसभेचं सदस्यत्व यामुळे धोक्यात आलं असतं म्हणूनच त्यांनी काँग्रेसला राजीनामा दिला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT