Death Threat Esakal
देश

Death Threat: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी

लखनऊ पोलिसांनी योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं सांगितलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात लखनऊच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊ पोलिसांनी योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार करण्याची धमकी आली होती. त्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भातले वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आपात्कालीन विभागाकडुन ११२ हा नंबर मदतीसाठी जारी केला आहे. याच क्रमांकावर एका अज्ञाता व्यक्तीने फोन केला होता. त्यावर मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लवकरच ठार करणार असल्याचं व्यक्तीने म्हंटलं आहे.

ही धमकी येताच हा फोन घेणाऱ्या ऑपरेटरने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर कलम ५०६, कलम ५०७ आणि आयटी अॅक्ट कलम ६६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणात लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धमकी देणारा अज्ञात कोण आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT