BMW accident news in Marathi  
देश

Accident Video: 'आज चारो मरेंगे' म्हणत बीएमडब्ल्यू पळवली २३०च्या वेगाने; पुढे जावून...

सकाळ डिजिटल टीम

रोहतास : उत्तर प्रदेशातील सुलतानपूरजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. बीएमडब्ल्यू आणि कंटेनरची धडक झाल्यानंतर हा अपघात झाला. मृत्युमुखी पडलेले चार जण बिहारचे होते. (BMW accident news in Marathi)

या अपघाताबाबतचा एक लाइव्ह व्हिडिओ समोर आला आहे, ज्यावरून हे स्पष्ट आहे की बीएमडब्ल्यूचा वेग 230 किमी प्रतितास होता. अपघातापूर्वी फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये आवाज येत आहे की 'आज चारो मरेंगे'. त्यानंतर काही वेळातच अपघात झाला आणि गाडीत बसलेले सर्वजण ठार झाले.

कारचा वेग 230 पर्यंत पोहोचला होता. अपघाताचा संपूर्ण व्हिडीओ फेसबुकवर अपलोड झाला नाही. मात्र ही टक्कर किती भीषण झाली असावी, याचा अंदाज नक्कीच लावता येईल. देहरी शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. निर्मलकुमार कुशवाह यांचा मुलगा डॉ. आनंद प्रकाश हे त्यांच्या मित्रांसोबत जात होते. दरम्यान, उत्तर प्रदेशातील सुलतानपूरजवळ एक अपघात झाला.

नारायण मेडिकल हॉस्पिटल कॉलेजमध्ये कार्यरत असलेले डॉ. आनंद प्रकाश हे त्यांच्या बीएमडब्ल्यू कारमधून नातेवाईक आणि दोन मित्रांसह दिल्लीला जात होते. आझमगड आणि सुलतानपूरजवळ एक्स्प्रेस हायवेवर उभ्या असलेल्या कंटेनरला बीएमडब्ल्यू कारची भीषण टक्कर झाली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT