Uttar Pradesh Agra BSF Solder Clashed With Miscreants
Uttar Pradesh Agra BSF Solder Clashed With Miscreants  Sakal
देश

BSF जवानाच्या पत्नीवर हल्ला; 7 वर्षांच्या लेकीमुळं मोठा अनर्थ टळला (VIDEO)

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशमधील आगरा येथे BSF जवानाच्या घरात घसून काही चोरांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी जवानाची पत्नी आणि सात वर्षांच्या लेकीनं दाखवलेल्या धाडसामुळे चोरांना पळ काढायला भाग पाडले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून जवानाच्या पत्नीसह लेकीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रेखा नावाच्या महिलेचे पती उर्वेश कुमार BSF मध्ये आहे. ते सध्या बीकानेर चेक पोस्टवर देशाच्या संरक्षणासाठी तैणात आहेत. जवान देशसेवेसाठी आपलं कर्तव्य बजावत असताना गुंडांनी त्यांच्या पत्नीला मारहाण करत घर लुटण्याचा प्रयत्न केला.

कधी आणि कशी घडली घटना

मंगळवारी दुपारी 2 वाजून 49 मिनिटांनी ही घटना घडली. रेखा नावाची BSF जवानाची पत्नी अवनी (07) आणि श्रव्या (03) या दोन मुलींसह घरी होती. तिचे सासू-सासरे परगावी गेले होते. आपल्या मोठ्या मुलीला शाळेतून घरी घेऊन आल्यानंतर दोन अज्ञात तरुण चोरी करण्याच्या इराद्याने घरात घुसले. एका तरुणाच्या हातात बंदूकही होती. त्यांनी रेखा यांना माराहणही केली.

जवानाच्या सात वर्षांच्या लेकीमुळं टळला मोठा अनर्थ

रेखा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी अवनी एअरफोर्सच्या शाळेत तिसरीच्या वर्गात शिकते. मंगळवारी अवनीच्या शाळेचा पहिला दिवस होता. तिला शाळेतून घरी घेऊन आल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. शाळेतून परतत असताना एटीएममधून 5 हजार रुपये रक्कम काढली. स्कुटीवरुन घरी आल्यानंतर मुली घरात गेल्या. मी स्कूटरवरुन उतरेपर्यंत दोन तरुण घरात घुसले. यातील एकाच्या हातात बंदूक होती. त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. आईला मारहाण होत असताना अवनी घराबाहेर गेली आणि तिने आरडाओरडा सुरु केला. तिच्या या कृतीमुळे चोरांनी लोक जमा होतील याच्या भितीपोटी पळ काढला. चोरांनी बंदुकीच्या बटच्या साहय्याने मारहाण केल्यामुळे रेखा या जखमी झाल्या आहेत.

सीसीटीव्हीत कैद झाली घटना

पोलिस अधिकारी अर्चना सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोर पर्ससह फरार झाले. या पर्समध्ये 5 हजार रोकड होती. याशिवाय एटीएम कार्ड, आधार कार्डही होते. रेखा यांच्या घरी पाच सीसीटीव्ही कॅमरे होते. त्यामुळे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या फुटेजच्या आधारे पोलिस चोरांचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT