yogi adityanath
yogi adityanath  
देश

उत्तर प्रदेशात कोरोनाचा स्फोट; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही लागण

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ - उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याची माहिती आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून दिली आहे. योगी आदित्यनाथ यांन म्हटलं की, सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर मी कोरोना चाचणी केली होती. कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे .सद्या मी सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि सल्ल्याने सर्व उपचार घेत आहे. माझे सर्व नियोजित कार्यक्रम हे व्हर्च्युअल होतील असंही योगींनी म्हटलं. 

योगी आदित्यनाथा यांनी सांगितलं की, राज्य सरकारचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु आहे. अलिकडच्या काळात जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि योग्य ती खबरदारी घ्या असं आवाहनही त्यांनी केलं. 

उत्तर प्रदेशात कोरोनाचा स्फोट
उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात दैनंदित व्यवहारांवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळं येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशातील रुग्ण संख्या आणखी झपाट्याने वाढेल, अशी शक्यता आहे. कालच्या आकडेवारीनुसार राज्यात 24 तासांत 18 हजार 021 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील अॅक्टिव रुग्णांची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचली आहे. सध्या राज्यात 95 हजार 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल दिवसभरात 3 हजार 474 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात लखनौमध्ये सर्वाधिक 5 हजार 382 नवे रुग्ण सापडेले आहेत. अलाहाबाद अर्थात प्रयागराज येथे 1 हजार 856 नव्या रुग्णांची नोदं झाली आहे. वाराणसीतही जवळपास दीड हजार रुग्ण एका दिवसात सापडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT