hema malini hema malini
देश

तीन मुख्यमंत्र्यांनी लढली नाही निवडणूक; हेमा मालिनी म्हणाल्या...

मायावती, अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणूक लढवली नाही

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका (Uttar pradesh Election) होऊ घातल्या आहेत. यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या जात आहे. अशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) मथुरेतून (Mathura constituency) निवडणूक लढू शकतात, असे बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यावर खासदार हेमा मालिनी (hema malini) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Uttar pradesh Election) तयारीत सर्वच पक्ष व्यस्त आहेत. अशात भाजपच्या खासदार हेमा मालिनी आठ दिवसांच्या दौऱ्यावर मथुरा (Mathura constituency) लोकसभा मतदारसंघात पोहोचल्या आहेत. यादरम्यान हेमा मालिनी (hema malini) यांनी मथुरा जंक्शन येथे आठ कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या विकासकामांचे उद्घाटन केले. हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) मथुरेतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या अटकळांना जोर धरला आहे. मुख्यमंत्र्यांनी मथुरेतून निवडणूक लढवली तर आमची हिंमत वाढेल, असे त्यांनी म्हटले.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे सांगितले नाही. परंतु, योगी आदित्यनाथ मथुरेतून निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात आहे. खुद्द योगी आदित्यनाथ यांच्यासह मागील तीन मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणूक लढवली (Uttar pradesh Election) नव्हती हे लक्षात घेण्यासारखे आहे.

मागील तीन मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढली नाही

मायावती, अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणूक लढवली नाही. तिघेही विधान परिषदेतून सभागृहात पोहोचले आणि मुख्यमंत्री झाले. आधी राज्यसभा नंतर दोनवेळा मथुरा लोकसभेच्या खासदार हेमा मालिनी यांनीही पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले होते. ही मोठी चूक झाली असून त्यावर कारवाई व्हायला हवी, असे हेमा मालिनी (hema malini) म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha : भाजपचे राज्यसभेचे उमेदवार ठरले, १० नेत्यांची नावे चर्चेत; यादी दिल्लीला पाठवली, कुणाला संधी?

Krishnaraj Mahadik Political Journey : स्पोर्ट्समन, युट्यूबर ते राजकारणी खासदार धनंजय महाडिक पुत्र कृष्णराजचा राजकीय प्रवास

Latest Marathi News Live Update : लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले

पवारांच्या राज्यसभेसाठी लेकीची फिल्डिंग! संजय राऊतांशी चर्चा, खर्गे आणि उद्धव ठाकरेंना भेटणार सुप्रिया सुळे

Toll tax on Indian Army: भारतात सैनिकांना टोल टॅक्समधून सूट मिळते का? जाणून घ्या नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT