देश

Azam Khan : आझम खानला दहा वर्षांची शिक्षा; डुंगरपूर केसमध्ये कोर्टाने ठोठावला १४ लाखांचा दंड

कोर्टाने आझम खानला दोषी ठरवून निकाल राखून ठेवला होता. डुंगरपूर प्रकरणात गुरुवारी स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश डॉ. विजय कुमार यांनी शिक्षेचा निर्णय दिला. आझम खान सध्या सीतापूर जेलमध्ये आहे. जेलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याची पेशी झाली.

संतोष कानडे

रामपूरः डुंगरपूर प्रकरणात जेलमध्ये असलेल्या आझम खान याला एमपी-एमएलए कोर्टाने गुरुवारी दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोबतच कोर्टाने त्याला १४ लाखांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने त्याला बुधवारी दोषी ठरवलं होतं.

आझम खान याच्यावर डुंगरपूर वस्ती जबरदस्तीने रिकामी करणे, मारहाण करणे, तोडफोड करणे, लुटमार करणे आणि धमकावण्याचा आरोप आहे. हे प्रकरण ६ डिसेंबर २०१६ चं आहे आझम खान याच्यावर या प्रकरणात २०१९ मध्ये केस दाखल झाली होती. रामपूरच्या एमपी-एमएलए सेशन कोर्टात प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

कोर्टाने आझम खानला दोषी ठरवून निकाल राखून ठेवला होता. डुंगरपूर प्रकरणात गुरुवारी स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश डॉ. विजय कुमार यांनी शिक्षेचा निर्णय दिला. आझम खान सध्या सीतापूर जेलमध्ये आहे. जेलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याची पेशी झाली.

सरकारी वकील शिव प्रकाश पांडे म्हणाले, 'जबरदस्तीने घर रिकामे करून ते पाडण्याच्या प्रकरणात रामपूरच्या विशेष कोर्टाने सपा नेते आझम खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे आणि 14 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : अमेरिका पाकिस्तानला मदत का करते? माजी CIA एजंटकडून स्वत:च्याच सरकारची पोलखोल; देशाला हादरवणारी माहिती समोर...

Divyang Niradhar Yojana: मोठी घोषणा! निराधार लाभार्थींना आता मिळणार महिन्याला 2500 रुपये; वाचा काय आहेत अटी?

Latest Marathi News Live Update: लहान मुलाचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद

Brazil Drug Bust : ट्रकच्या टायरमध्ये लपवला होता ३५० कोटींचा माल, चाणाक्ष कुत्र्यामुळे मोठे रॅकेट उघड, नेमकं काय घडलं?

राज्यात वीज दर कमी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमाफीवरही बोलले

SCROLL FOR NEXT