देश

भाजपने पक्षातून तर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हाकललं

सकाळ डिजिटल टीम

उत्तराखंडचे मंत्री हरक सिंह रावत यांच्यावर भाजपने बडतर्फीची कारवाई केली आहे. पक्षातून सहा वर्षासाठी त्यांची हकालपट्टी करण्यात आली असून यातून कठोर असा संदेश भाजपने दिला आहे. रावत यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्यानं भाजपने ही कारवाई केली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरक सिंह रावत यांनी मंत्रीमंडळातून बरखास्त केलं आहे. हरक सिंह रावत हे त्यांची सून अनुकृतीसाठी लँसडौन विधानसभा मतदारसंघातून तिकिटाची मागणी करत होते. तसंच ते काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी करतायत अशीही चर्चा गेल्या काही काळात सुरु होती.

हरक सिंह रावत यांची ६ वर्षांसाठी भाजपने पक्षातून हकालपट्टी केली. उत्तराखंडचे माध्यम प्रभारी मनवीर सिंह चौहान यांनी सांगितलं की, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांच्या आदेशानुसार रावत यांना पक्षाने सहा वर्षासाठी काढून टाकलं आहे.

रावत यांनी शिस्तपालन न केल्यानं त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. पक्षात शिस्तभंग खपवून घेतली जाणार नाही असाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, दुसरीकडे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही रावत यांना मंत्रिमंडळातून बरखास्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT