Viral Video 
देश

Viral Video: नदीला भयानक पूर, भाविक बुडताना दिसला; NDRF च्या जवानाने काय केलं पाहाच

Uttarakhand NDRF Viral Video: नडीआरएफच्या जवानांच्या धाडसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून लोक एनडीआरएफच्या जवानांचे कौतुक करत आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशातील विविध भागामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. उत्तराखंडमध्ये देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोकांचे स्थलांतर केले जात आहे. त्यांना सुरक्षितस्थळी नेले जात आहे. अशावेळी एनडीआरएफचे जवान महत्त्वाची भूमिका बजावत असताना दिसत आहेत. एनडीआरएफच्या जवानांच्या धाडसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून लोक एनडीआरएफच्या जवानांचे कौतुक करत आहेत.

व्हिडिओ उत्तराखंडच्या हरिद्वारमधील आहे. याठिकाणी एक तरून पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात होता. अशावेळी एनडीआरएफच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता नदीमध्ये उडी घेऊन तरुणाचे प्राण वाचवले आहेत. व्हिडिओ पाहून घटनेचा थरार अनुभवता येईल. जवानाने केलेली ही कामगिरी कौतुक करण्यासारखीच आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

एनडीआरएफच्या जवानांचे हे धाडस असामान्यच आहे असं म्हणावं लागेल. एनडीआरएफच्या जवानांना अशा परिस्थितीसाठी प्रशिक्षित केले जाते. पण, आपला जीव धोक्यात घालण्याचे साहज हे प्रशिक्षण घेऊन मिळत नसतं. यासाठी मनात दुसऱ्यांबद्दल प्रेमच असायला लागतं. मात्र, जवानांनी दाखवलेलं धाडस सामान्य नागरिकांनी दाखवू नये असं आवाहन केलं जात आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, नदीच्या पाण्याचा प्रवाह जोराचा आहे. त्यात एक भाविक वाहून जात आहे. अशावेळी जवान नदीच्या या जोराच्या वाहत्या प्रवाहात उडी घेतात. पोहोत बुडणाऱ्या व्यक्तीच्या जवळ जातात आणि पुढे जाऊन किनारा गाठतात. एनडीआरएफच्या जवानांनी वाचवलं नसतं त्या तरुणाचा जीव वाचणे अवघड होते. त्यामुळेच जवानांच्या धाडसाला सलाम केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT