Uttarakhand Police takes whatsap service initiative for Women safety
Uttarakhand Police takes whatsap service initiative for Women safety 
देश

उत्तराखंड पोलिसांचे मोठे पाऊल; महिला सुरक्षेसाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू

वृत्तसंस्था

देहराडून : सध्या महिला अत्याचाराच्या घटना दररोज कानावर येत असताना, उत्तराखंड राज्याने मात्र महिलांच्या सुरक्षेबाबत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. उत्तराखंड पोलिसांनी महिला व्हॉट्सअॅप सेवा सुरू केली आहे. पोलिस महासंचालक अशोक कुमार यांच्या नेतृत्त्वात सुरू करण्यात आलेल्या महिला सुरक्षा कक्षात या व्हॉट्सअॅप सेवेची सुरवात करण्यात आली आहे. ज्यामुळे महिला व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देऊन सुरक्षित राहू शकतात. 

कुमार यांनी सांगितले की, 'राज्यातील मुली, महिला या व्हॉट्सअॅप सेवेत 9411112780 या मोबाईल नंबरवर आपली तक्रार नोंदवू शकतात. तसेच या नंबरवर कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ, मेसेज पाठवू शकतात. हे सर्व मेसेजचे पोलिस मुख्यालयातील महिला सुरक्षा विभागातून नियंत्रण केले जाईल व दखल घेतली जाईल.' 

याबाबत अधिक माहिती अशी की, या नंबरवर आलेल्या तक्रारींचे विश्लेषण करून त्या ज्या जिल्ह्यात घडल्या आहेत, तेथील पोलिस स्थानकांना कळवल्या जातील व स्थानिक पोलिस दोषींवर कारवाई करतील. यामुळे महिला व मुली त्यांच्यासोबत होणाऱ्या छेडछाडीचे किंवा गैरवर्तनाचा व्हिडिओ या नंबरवर त्वरित पाठवतील व लगेचच त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 

पोलिस पिडितेपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त तक्रारीची गरज नाही, तर केवळ एका मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ पाठविल्यास लगेचच त्यावर कारवाई होईल. ज्या महिला पोलिस स्टेशनपर्यंत येत नाहीत, अशा महिलांनाही व्हॉट्सअॅप सेवेचा उपयोग होईल, असे कुमार यांनी सांगितले.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईने जिंकली नाणेफेक! जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग ११

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT