vaccination Sakal
देश

बारा वर्षांपर्यंतच्या मुलांनाही लस

बारा या वयोगटातील मुलांना कोर्बेव्हॅक्स लस, तर सहा ते बारा वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता अनेक शहरांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात येत आहे. या परिस्थितीत आता एक मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने बारा वर्षांपेक्षा लहान मुलांच्या लसीकरणाला मान्यता दिली आहे. वय वर्षे पाच ते बारा या वयोगटातील मुलांना कोर्बेव्हॅक्स लस, तर सहा ते बारा वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. भारतीय केंद्रीय औषध महानियंत्रकांनी या लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोनाविरोधातील लढाई आणखी मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या वयोगटातील मुलांसाठी या दोन लसी निवडण्यात आल्या आहेत. यासोबतच १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी झायकोव्ह-डी लसीचे दोन डोस देण्यासही परवानगी दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आरोग्यमंत्र्यांनी लहान मुलांच्या लसीकरणास परवानगी दिल्याचे म्हटले असले, तरी हे लसीकरण कधी आणि कुठे सुरू होईल, हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. लवकरच याबाबतची माहितीही समोर येईल, असेही सांगण्यात येत आहे. देशातील अनेक भागांमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे. केंद्र सरकारने दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना आणि मिझोराम या राज्यांना कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत दक्षतेचा इशारा दिला होता. अशा परिस्थितीत कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याची सूचना केली होती.

मोदींची आज बैठक

देशातील कोरोना परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (ता.२७) महत्त्वाची बैठक घेणार आहेत. यादरम्यान ते सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण सादरीकरण करणार आहेत. देशात कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याने पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT