omicron sakal
देश

लसीकरण व मास्क हाच ओमिक्रॉनवर प्रभावी उपाय

‘एम्स’चे संचालक डॉ. गुलेरिया यांचे मत

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ओमिक्रॉन (Omicron)या कोरोनाच्या(corona) नव्या प्रकारापासून स्वतःला वाचवायचे असेल तर, लसीकरण(vaccination) व सतत मास्क वापरणे हाच उपयुक्त व परिणामकारक उपाय आहे, असे निरीक्षण दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नोंदवले आहे. या प्रकाराच्या घातक क्षमतेबाबतचा अंदाज आला की सध्याच्या लसींमध्ये काही बदल करता येणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

ओमिक्रॉनच्या(omicron) वाढत्या रुग्णसंख्येबाबत केंद्र सरकारने वेगवान हालचालींना सुरवात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना लिहिलेल्या पत्रात आरोग्य नियमांची कडक अंमलबजावणी, चाचण्या वाढविणे व गरज पडेल तेव्हा त्या त्या गावांत-भागांत रात्रीची संचारबंदी त्वरित सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. डेटा अॅनॅलिसिसवर जोर देण्याचीही सूचना आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात केली आहे.

डॉ. गुलेरिया म्हणाले, ‘‘ओमिक्रॉनपासून संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सध्याच्या दोन्ही लसी पुरेशा प्रभावी दिसत आहेत. कोरोनाचे नवनवे प्रकार येत आहेत. त्यातील काहींमध्ये मानवी प्रतिकारक्षमता कमी करण्याचीही क्षमता असू शकते. त्यामुळे प्रत्येकाने अखंड सावधानता बाळगायला पाहिजे. लसीकरण व मास्क यांना पर्याय दिसत नाही. हा नवा प्रकार डेल्टापेक्षा तिपटीने जास्त संक्रमित आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. अर्थात तो सध्या क्षीण स्वरूपात आहे हा आशेचा किरण आहे. तरीही भारतासाठी पुढील काही आठवडे अतिशय संवेदनशील व महत्त्वाचे ठरणार आहेत.’’

दरम्यान, देशात मुंबई व दिल्लीसह ओमिक्रॉनची रूग्णसंख्या २०० वर पोहोचली आहे. या दोन्ही महानगरांत प्रत्येकी ५४-५४ रूग्ण आढळले असून त्यानंतर तेलंगणात २० ओमिक्रॉन रूग्ण आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: 500 च्या जळलेल्या नोटा कुणाच्या होत्या? Justice Yashwant Varma Cash कांडाची पूर्ण Timeline

Mumbai High Court Order : जयगड बंदरातील आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; साडेनऊ कोटी भरा, नाहीतर गॅस रिकामा करा!

Pune Tunnel: पुण्यात आणखी एक बोगदा! सुतारदरा ते पाषाण भुयारी मार्गासाठी लवकरच सल्लागार नियुक्त, महापालिकेचा मोठा प्लॅन

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे कर्वेनगर भागात पडलेल्या प्रचंड खड्डे दुरुस्ती साठी मनसे तर्फे वारजे क्षेत्रीय प्रमुखांना तुकाराम मुंडे यांची प्रतिमा भेट

Gokul Election Update : 'गोकुळ'ची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी जाहीर; 4,897 संस्थांना मतदानाचा हक्क, 'इतक्या' संस्थांना बसला फटका!

SCROLL FOR NEXT