PM-Narendra-Modi
PM-Narendra-Modi sakal
देश

लसीकरण प्रमाणपत्राला परस्पर सहमती असावी

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन (पीटीआय) : लसीकरण प्रमाणपत्राबाबत परस्पर सहमतीने आंतरराष्ट्रीय प्रवास सोयीचा केला जावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. विदेशी नागरिकांना आपल्या देशात प्रवेश देण्याबाबत विविध देशांचे वेगवेगळे नियम असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आयोजित केलेल्या जागतिक कोविड परिषदेत पंतप्रधान मोदींनी व्हिडिओद्वारे सहभाग घेतला होता. ‘भारतात लसीकरण मोहिमेला वेग आला असून आम्ही उत्पादन क्षमताही वाढवत आहोत. इतर देशांनाही अधिक प्रमाणात लस पुरवठा करण्यासाठी जागतिक पुरवठा साखळी सर्वांसाठी खुली करणे आवश्‍यक आहे. जागतिक साथीमुळे झालेल्या आर्थिक परिणामांकडेही लक्ष द्यायला हवे.

एकमेकांच्या लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता देऊन आंतरराष्ट्रीय प्रवास सोयीचा करता येईल,’ असे मोदी यांनी त्यांच्या व्हिडिओद्वारे केलेल्या भाषणात सांगितले. विदेशी प्रवाशांसाठी नवे नियम जाहीर करताना ब्रिटनने ॲस्ट्राझेनेका लस घेतलेल्यांना प्रवेशासाठी मंजुरी दिली असली या यादीतून त्यांनी भारतातील प्रवाशांना वगळले आहे. यावरून सध्या दोन देशांमध्ये चर्चा सुरु आहे.
भारतातील लसीकरण मोहिमेची माहिती देताना मोदी यांनी सांगितले की,‘भारतात जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहिम राबविली जात आहे. आतापर्यंत २० कोटी भारतीयांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आम्ही आतापर्यंत ९२ देशांना लस पुरविली आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT