adar poonawala main.jpg 
देश

'सीरम'कडून लशीची किंमत जाहीर; सरकारी आणि खासगी रुग्णालयांसाठी वेगळा दर

कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्डचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या लसीची किंमत जाहीर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्डचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या लसीची किंमत जाहीर केली आहे. त्यानुसार, सर्व राज्यांच्या सरकारी रुग्णालयांसाठी ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये इतकी किंमत सीरमने निश्चित केली आहे. त्याचबरोबर सीरमच्या उत्पादन क्षमतेच्या ५० टक्के लस केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेसाठी देण्यात येणार आहे तर उर्वरित ५० टक्के लस या राज्यांना आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे. अधिकृत निवेदनाद्वारे सीरमने हे जाहीर केलं आहे.

सध्या देशात जी लसीकरण मोहिम सुरु आहे, ती केंद्र सरकारकडून नियंत्रित केली जात आहे. यासाठी लागणारे लसींचे डोसही केंद्र सरकारने सीरमकडून विकत घेतले आहेत. तसेच ते राज्यांना आणि खासगी लसीकरण केंद्रांना वितरीत केले आहेत. मात्र, यापुढे आता राज्यांना आणि खासगी रुग्णालयांना स्वतंत्ररित्या हे डोस विकत घ्यावे लागणार आहे.

परदेशी लशींच्या तुलनेत कोविशिल्ड स्वस्त

सीरमने आपल्या निवदेनात म्हटलं की, भारत सरकारच्या निर्देशांनंतर आम्ही कोविशिल्ड लसीच्या किंमतींची घोषणा करत आहोत. त्यानुसार, राज्य सरकारांसाठी या लसीची किंमत ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये प्रतिडोस असेल. परदेशी लसींच्या तुलनेत कोविशिल्ड लस खूपच स्वस्त असल्याचंही सीरमनं म्हटलं आहे. त्यानुसार, अमेरिकन लसीची किंमत १५०० रुपये प्रतिडोस, रशियन लस प्रतिडोस ७५० रुपये तर चीनी लस प्रतिडोस ७५० रुपये असल्याचं सीरमने आपल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे.

पुढील ५ महिन्यांत लस किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध

सध्याच्या काळात लसींची तातडीची आवश्यकता आणि अनेक आव्हानं समोर असल्यानं प्रत्येक कंपनीला वैयक्तिकरित्या लस उपलब्ध करुन देणं शक्य नाही. त्यामुळे सर्व कॉर्पोरेट्स आणि खासगी कंपन्यांना राज्याच्या सुविधा व्यवस्थेकडून आणि खासगी आरोग्य यंत्रणांकडून लस उपलब्ध होऊ शकते. पुढील ४ ते ५ महिन्यांत लस बाजारात किरकोळ आणि मोफत विक्रीसाठी उपलब्ध होईल, असंही सीरमनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shikhar Dhawan: कायदेशीर सामना धवनने जिंकला! पहिल्या बायकोकडून मिळणार ५.२ कोटी, आयेशासाठी वाढल्या अडचणी

Holi 2026: होळीवर ग्रहणाचा वेळ किती असेल? भद्रा कधीपर्यंत राहील, होलिका दहनाचा मुहूर्त येथे जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : दुष्ट आणि अनैतिक व्यक्तीला शंकराचार्य म्हणणे हा सनातन धर्माचा घोर अपमान

Agricultural News : कांदा उत्पादकांसाठी गुड न्यूज! निर्यात शुल्कातील जाचक अटी हटवल्या; आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा कायम राहणार

Kagal Accident : पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; कागलच्या ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT