Adhiraranjan Chaudhary esakal
देश

Adhiraranjan Chaudhary : गांधी घराण्यातील असल्याने वरुण यांना तिकीट नाकारले ; काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांचा दावा

चौधरी यांनी वरुण गांधी यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केले

सकाळ डिजिटल टीम

बेहरामपूर (पश्‍चिम बंगाल) : ‘वरूण गांधी यांचे गांधी घराण्याशी नाते असल्यानेच त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली,’ असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीररंजन चौधरी यांनी आज केला. तसेच, चौधरी यांनी वरुण गांधी यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केले.

वरुण गांधी हे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू आणि दिवंगत नेते संजय गांधी यांचे पुत्र आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव नाही. यावरून भाजपवर टीका करताना अधीररंजन चौधरी म्हणाले,‘‘वरूण हे शक्तिशाली नेते आहेत. त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे. त्यांचा गांधी घराण्याशी संबंध असल्यानेच भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. वरुण यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, ते येथे समाधानी राहतील.’’

वरुण गांधी हे भाजपतर्फे दोन वेळा उत्तर प्रदेशातील पिलिभित मतदारसंघातून निवडून आले आहेत. यंदा मात्र त्यांच्याऐवजी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जीतिनप्रसाद यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. वरुण यांच्या मातु:श्री खासदार मेनका गांधी यांना मात्र भाजपने सुलतानपूर येथून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT