varun gandhi question to pm modi 
देश

PM Modi : सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क कोणाचा असायला हवा?, वरुण गांधींचा सवाल

PM मोदी यांच्या 'मुफ्त की रेवडी' या टिप्पणीवरून गांधी यांनी थेट केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

PM मोदी यांच्या 'मुफ्त की रेवडी' या टिप्पणीवरून गांधी यांनी थेट केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.

सध्या देशात अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे केंद्र आणि विरोधी नेत्यांनी टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान, आता एक वेगळी राजकीय बातमी समोर येत आहे. भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मागील पाच वर्षांत भ्रष्ट उद्योगपतींचे १० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले असल्याचे म्हणत लक्ष वेधले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मुफ्त की रेवडी' या टिप्पणीवरून गांधी यांनी थेट केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.

यासंदर्भात वरून गांधी यांनी एक ट्वीट केलं आहे. यात ते म्हणतात की, 'जी संसद गरिबांना पाच किलो रेशन दिल्यानंतर त्यांच्याकडून आभाराची अपेक्षा करते, त्याच सभागृहाने मागील पाच वर्षांत भ्रष्ट उद्योगपतींची १० लाख कोटींची कर्ज माफ केल्याची माहिती दिली आहे. ही 'फुकटची रेवडी' घेणाऱ्यांमध्ये मेहुल चोक्सी आणि ऋषी अग्रवाल यांचे नाव आघाडीवर आहे. सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क कोणाचा असायला हवा?' असा प्रश्न वरुण यांनी ट्विटरवरून केला आहे.

कर्जबुडव्या उद्योगपतींच्या प्रश्नावर सरकारने संसदेत दिलेल्या उत्तरातील 'टॉप १०' कर्जबुडव्यांची यादी वरुण गांधी यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केली. यात कर्जबुडव्यांच्या यादीतील दोन कंपन्या चोक्सी आणि अग्रवाल यांच्याशी संबंधित आहेत. कोरोनाच्या साथीपासून पंतप्रधान मोदी ८० कोटी गरिबांना विनामूल्य अन्नधान्य देत असल्याचे अन्य एका भाजप खासदाराने लोकसभेत चर्चेत म्हटले होते.

दरम्यान, निवडणुकीत लाभासाठी फुकट वस्तू वा सेवा देण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांची पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच 'मुफ्त की रेवडी' असे म्हणत खिल्ली उडवली होती. त्यानंतर नवीन चर्चेला तोंड फुटले होते. आता या वक्तव्यानंतर पुन्हा भाजपमध्ये अनेक चर्चांना ऊत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Chairman Apology Video : आता ‘इंडिगो’च्या अध्यक्षांचाही माफीनामा ; ‘CEO’नी आधीच सरकारसमोर जोडले होते हात!

Eknath Khadse : भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना मोठा धक्का; दोषमुक्ती अर्ज न्यायालयाने नाकारला!

Pune IT Company employee News : ‘कॅन्सर’ झाला म्हणून कर्मचाऱ्याला कामावरुनच काढलं? ; पुण्यातील प्रसिद्ध 'IT' कंपनीतील प्रकार

Akola News : अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावर विधानसभेत तीव्र संताप; सेंट अ‍ॅन्स शाळेची मान्यता रद्द करण्याची आ. रणधीर सावरकर यांची मागणी!

एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे प्रवास’ योजना! राज्यात, परराज्यातील प्रवासासाठी कमी केले २०० ते ८०० रुपयांनी सवलतीच्या पासची रक्कम, जाणून घ्या दर...

SCROLL FOR NEXT