Varun Gandhi News
Varun Gandhi News 
देश

Varun Gandhi: मोदींच्या नेतृत्वात भारत योग्य दिशेने? चर्चेसाठीचं ऑक्सफोर्डचं आमंत्रण वरुण गांधींनी नाकारलं; कारण...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत योग्य मार्गावर आहे की नाही, या चर्चेत सहभागी होण्याचे ऑक्सफर्ड युनियनचे निमंत्रण भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी नाकारले आहे.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशांतर्गत प्रश्नांवर चर्चा करणे योग्य नाही आणि तसे करणे अनैतिक ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते असे पाऊल उचलणे हे 'अपमानास्पद कृत्य' ठरेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी सरकारच्या धोरणांवर नापसंती व्यक्त करणाऱ्या गांधी यांनी ऑक्सफर्डमधील प्रतिष्ठित डिबेटिंग सोसायटीकडून 'मोदींच्या नेतृत्वात भारत योग्य मार्गावर' या विषयावर बोलण्याचे आमंत्रण न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

लंडनमध्ये राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर भाजपकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. तसेच परदेशात जावून भारतीय लोकशाहीची प्रतिमा खराब केल्याचा दावाही भाजपकडून करण्यात येत आहे.

युनियनचे अध्यक्ष मॅथ्यू डिक यांनी भाजप आमदारांना देखील चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे, जे एप्रिल ते जून दरम्यान होणार आहे.

युनियनला दिलेल्या उत्तरात त्यांनी आमंत्रण नाकारले आणि भारतात त्यांच्यासारख्या लोकांना अशा विषयांवर सहजपणे चर्चा करण्याची वारंवार संधी मिळते. या व्यतिरिक्त सार्वजनिक व्यासपीठांवर आणि संसदेत आपण सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.

मात्र भारताबाहेर जावून सरकारच्या धोरणांवर टीका करणे हे देशहिताच्या विरोधात जाईल आणि अपमानास्पद कृत्य मानले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान केंद्र आणि राज्य स्तरावरील विशिष्ट धोरणांबाबत राजकारण्यांची मते वेगवेगळी असली, तरी भारताच्या विकासाला चालना देण्याचे त्यांचे ध्येय एकच आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT