देश

#MeToo वरुण ग्रोव्हरचा "सत्या'चा आग्रह 

पीटीआय

नवी दिल्ली : "मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक शोषणाचे आरोप झाले आहेत. यावर वरुण ग्रोव्हर यांनी ब्लॉगमध्ये काही स्क्रीनशॉट शेअर केले असून, प्रकरण लवकरात लवकर मिटवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

बनारस हिंदू विद्यापीठात शिक्षण घेत असताना शोषण झाल्याचा आरोप एका युवतीने केला आहे. त्यावर वरुण ग्रोवर यांनी खुलासा देत ट्‌विटरवर खुले पत्र लिहले आहे. या वेळी त्यांनी पत्रातून "सत्याचा आग्रह' केला आहे. आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे नमूद केले आहे. क्रांती खूपच सुंदर असते. मन निर्मळ करणारे, शक्तिशाली आणि मी-टू अभियानासारखी आवश्‍यक असणारी क्रांती असते. माझ्यावर आरोप झाल्यानंतर मागील आठवडा वादळी ठरला. माझ्याविरुद्ध आतापर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही, तरीही मी बाजू मांडावी, असे मला वाटते. मन मोकळे करण्यासाठी आणि शांतता लाभण्यासाठी ही बाब आवश्‍यक आहे, असे ग्रोव्हर यांनी म्हटले आहे. मी निर्दोष असून हे मी सिद्ध करू शकतो, असेही त्याने नमूद केले. 

आरोपामुळे कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून, तरीही ते माझ्यासोबत आहेत. बनारस हिंदू विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक ज्युनिअर मुलींशी संपर्क केला असून, असे या घटनेची खातरजमा केली आहे. तरीही याबाबत तठस्थपणे चौकशी करावी, अशी मागणी ग्रोव्हर यांनी केली.

दरम्यान, ग्रोव्हर यांच्या पत्राला त्या मुलीने उत्तर दिले असून आपण भावना समजू शकतो किंवा सहानभुतीही दाखवू शकतो; परंतु आपण पुढील स्पष्टीकरणासाठी स्रोतांशी संपर्क साधण्यास तयार असल्याचेही म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT