Anil Antony Joins BJP 
देश

Anil Antony Joins BJP: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

राहुल शेळके

Anil Antony Joins BJP: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

केरळ काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे माजी संयोजक अनिल अँटोनी यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, व्ही मुरलीधरन, केरळ भाजप अध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

2002 च्या गुजरात दंगली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या वादानंतर अनिल अँटनी यांनी जानेवारीमध्ये काँग्रेस सोडली. (Veteran Congress leader AK Antony's son Anil Antony joins BJP)

अनिल अँटोनी यांचे वडील ए.के.अँटनी काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री होते. याशिवाय ते केरळचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. ए के अँटोनी यांचे नाव बड्या नेत्यांमध्ये घेतले जाते.

पक्ष सोडण्यापूर्वी अनिल अँटनी केरळमध्ये काँग्रेसचा सोशल मीडिया सेल चालवत होते. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी बीबीसीच्या माहितीपटाला भारताविरुद्ध पक्षपाती म्हटले होते.

पक्ष सोडण्यापूर्वी अनिल अँटनी केरळमध्ये काँग्रेस पक्षाचा सोशल मीडिया सेल चालवत होते. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी बीबीसीच्या माहितीपटाला भारताविरुद्ध पक्षपाती म्हटले होते.

भाजपमध्ये त्यांचे स्वागत करताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, अनिल अँटनी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांची विचारसरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मिळती जुळती आहे.

आम्हांला खात्री आहे की ते अतिशय सक्रिय भूमिका बजावत राहतील आणि दक्षिण भारतात भाजपचा ठसा वाढवण्यात मदत करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Red Alert: नाशिकला रेड अलर्ट; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सप्तशृंगी गड व नांदुरी घाट मार्ग ७ ते ९ जुलैपर्यंत भाविकांसाठी बंद

Junnar Rains : जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसाने धरणसाठा वाढला; अलदरेतील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Pune Mula-Mutha flood : मुळा-मुठा नदीला पूर; कोरेगाव मुळ येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पुल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

India T20I Squad: भारताचा T20I संघ जाहीर! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजू सॅमसनला डच्चू, तर रिंकू सिंगचे पुनरागमन

Raigad Flood : रायगडमध्ये मुसळधार पावसाने कहर; सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्या धोक्यापलीकडे, जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT