uddhav thackeray
uddhav thackeray 
देश

उद्धव ठाकरेंचे वक्तव्य ढोंगीपणा; राममंदिराच्या मुद्यावरून ‘विहिंप’ची टीका

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. २७ ः रामजन्मभूमी अयोध्येतील मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना म्हणजे मंदिराला आंधळेपणे विरोध करणे असून ठाकरे यांची ही निव्वळ ढोंगबाजी़ असल्याची टीका विश्‍व हिंदू परिषदेने(विहिंप) केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी प्रखर हिंदुत्वासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेची ही किती घोर अधोगती आहे, असे ‘विहिंप’चे कार्याध्यक्ष आलोककुमार यांनी म्हटले आहे.

राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा ऐतिहासिक असेल व जगभरातील कोट्यवधी भारतीय त्यात आपापल्या परीने सहभागी होऊ इच्छित आहेत. अशा स्थितीत ठाकरे यांची सूचना नकारात्मकच नव्हे तर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या अधोगतीचेही ते द्योतक असल्याचे आलोककुमार म्हणाले.

अलोक कुमार यांनी असंही सांगितलं की कोणत्याही इमारतीच्या बांधकामापूर्वी भूमिपूजन हा पवित्र व आवश्‍यक सोहळा किंवा कार्यक्रम असतो. ज्याद्वारे जमीन खोदण्याआधी पृथ्वीमातेची परवानगी व आशीर्वाद मागितले जातात. हा अपार श्रद्धेचा विषय असल्याने हे काम दिल्लीत बसून व्हिडिओ काँन्फरन्सिंगद्वारे होऊ शकत नाही. कोरोना महामारीमुळे प्रत्यक्ष कार्यक्रमात केवळ २०० लोकांनाच प्रवेश असेल व आरोग्य सूचनांचे काटेकोर पालन केले जाईल असे विहिंपने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत ठाकरे यांनी भूमिपूजनाबाबत नव्याने घेतलेली भूमिका व त्यांची कथित चिंता केवळ नवे ढोंग आहे असेही टीकास्त्र आलोकुमार यांनी सोडले आहे.

विरोध करणारे ते राम-द्रोही
अयोध्येतील प्रस्तावित भव्य श्रीराम मंदिराच्या कामाला निर्विघ्नपणे सुरवात व्हावी यासाठी विहिंपने आज दिल्लीत महायज्ञाचे आयोजन केले होते. विहिंपचे प्रवक्ते विनोद बन्सल हे या यज्ञाचे यजमान व संयोजक होते. मंदिराला या ना त्या प्रकारे विरोध करणाऱ्या आणि बाबरवाद्यांचे शेपूट बनलेल्या सर्व राम-द्रोही लोकांना सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना आम्ही रामाकडे केल्याचे विहिंपने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT