Bharat Jodo Yatra 
देश

Video: जम्मू-काश्मीरमध्ये राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेला मोठी सुरक्षा व्यवस्था

यात्रेला केंद्रानं व्यवस्थित सुरक्षा व्यवस्था पुरवली नसल्याचा आरोप करत राहुल गांधींनी ही यात्रा स्थगिती केलो होती.

सकाळ डिजिटल टीम

Bharat Jodo Yatra, Avantipora : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सुरु आहे. या यात्रेदरम्यान केंद्रानं पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवलेली नाही, असा आरोप करत राहुल गांधींनी ही यात्रा स्थगित केली होती.

त्यांच्या या गंभीर आरोपानंतर आता यात्रेला मोठं सुरक्षा कवच प्रदान करण्यात आलं आहे, याचा व्हिडिओ समोर आला आहे. (Video Big security arrangements for Rahul Gandhi Bharat Jodo Yatra in Jammu and Kashmir Avantipora)

जम्मू आणि काश्मीरच्या अवंतीपोरा इथं सध्या भारत जोडो यात्रा सुरु आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्या बहिण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी देखील सहभागी झाल्या आहेत. तसेच पीडीपीच्या प्रमुख महबुबा मुफ्ती देखील या यात्रेत सहभागी झाल्या.

राहुल गांधी यांनी सुरक्षा व्यवस्थेवरुन नाराजी व्यक्त केली होती, यात्रेत चालताना आपले अनेक सहकारी जखमी झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळं आपल्याला ही यात्रा स्थगित करताना दुःख होत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, अवंतीपोरा इथं भारत जोडो यात्रेला केंद्रानं जवानांची मोठी सुरक्षा पुरवली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मोठ्या प्रमाणावर जवान सुरक्षेसाठी दिसून आले आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधींसोबत ते या यात्रेत चालताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT