vijay mallya 
देश

विजय मल्ल्याच्या न्यायालयीन अवमान प्रकरणी होणार सुनावणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील विविध बॅंकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या याचा समावेश असलेल्या न्यायालयीन अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुढील वर्षी अठरा जानेवारी रोजी अंतिम सुनावणी घेण्याचे ठरविले आहे. याप्रकरणामध्ये आम्ही बराच काळ वाट पाहिली असून आता आणखी काहीकाळ वाट पाहणे आम्हाला शक्य नसल्याचे न्या. यू. यू. ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे.

याआधी २०१७ मध्ये अवमानप्रकरणी मल्ल्याला दोषी ठरविण्यात आल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. आज ज्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली त्यामध्ये न्या. एस.आर.भट आणि न्या. बेला.एम.त्रिवेदी यांचाही समावेश होता. ‘‘ मल्ल्याला त्याची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, अन्य कोणत्याही कारणामुळे त्याला सुनावणीला उपस्थित राहणे शक्य नसेल तर त्याच्यावतीने वकील युक्तिवाद करू शकतात.’’ असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.

आम्हाला हे प्रकरण आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच निकाली काढायचे आहे. याआधी देखील आम्ही बराच काळ वाट पाहिली असून आता आणखी शक्य होणार नाही, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. या प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ जयदीप गुप्ता यांना न्यायालयीन मित्र म्हणून काम पाहण्याची विनंती कोर्टाकडून करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Farmer Protest : अभिजीत दिपके आता शेतकरी आंदोलनात सामिल होणार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही कायम सोबत असल्याचा दिला विश्वास

स्वतःच्या लग्नाला ग्राऊंड्समन्सना बोलावलं... शेतकऱ्यांसाठी उभा राहिला... यशस्वी जैस्वालला शिस्त शिकवली... असा आहे अजिंक्य रहाणे!

Ratnagiri Bhatye Breakwater Project : रत्नागिरीत 143 कोटींचा मेगा प्रोजेक्ट! 'या' भागात सुरू होणार 'सी-प्लेन' सेवा; पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

Latest Marathi News Live Update : मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर जोरदार टीका

Mumbai News: 'बाबरी' पाडली जाऊ नये म्हणणे देशद्रोह नव्हे, मुंबई पोलिसांचा तडीपारीचा आदेश रद्द; हायकोर्टाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT