chandrababu-naidu 
देश

Chandrababu Naidu: चंद्राबाबू नायडूंच्या अडचणीत वाढ; तुरुंगातला मुक्काम आणखी वाढला

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, विजयवाडाच्या एसीबी कोर्टाने चंद्राबाबू नायडू यांची कोठडी ५ ऑक्टोंबरपर्यंत वाढवली आहे. कौशल विकास घोटाळ्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली होती. (Vijayawada ACB court extends TDP chief and former CM Chandrababu Naidu remand)

नायडू यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडत आहेत. दोन दिवसांपूर्वी चंद्राबाबू यांनी हायकोर्टात धाव घेत त्यांच्याविरोधातील एफआयआर मागे घेण्याची मागणी केली होती. याप्रकरणातील एफआयआर रद्द करण्यास हायकोर्टाने नकार दिला होता. चंद्राबाबू नायडू यांना सीबीआयने ९ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तेव्हापासून त्यांच्या अडचणी वाढतच आहेत.

स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आलीये. या घोटाळ्यामुळे राज्य सरकारचं ३०० कोटी रुपयांचं नुकसान झालंय, असं आंध्र प्रदेश राज्याचे सीआयडी प्रमुख एन संजय यांनी म्हटलं होतं. याआधी विजयवाडाच्या स्थानिक कोर्टानं चंद्राबाबू नायडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

चंद्राबाबू यांना गुन्हेगार आणि माओवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या. आता ते त्याच तुरुंगात आहेत जेथे हे गुन्हेगार आहेत. त्यामुळे तेलगू देसम पार्टीकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. नायडू हे पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजमहेंद्रवरम मध्यवर्ती कारागृहात कैदेत आहेत.

नायडू यांच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेत, त्यांना स्वतंत्र सेलमध्ये ठेवण्याचे आदेश एसीबी कोर्टानं कारागृहाच्या अधीक्षकांना दिल्याचं समजते. माहितीनुसार, नायडू यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आलीये. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT