gadchiroli ANI
देश

Chhattisgarh Election: नक्षलवाद्यांनी मतदान केंद्र खरंच घेतलंय ताब्यात? मतदानाची काय आहे स्थिती?

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु झालं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Chhattisgarh Assembly Election: छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु झालं आहे. या राज्यातील अनेक भाग नक्षलग्रस्त असून आज सकाळी नक्षलवाद्यांनी एक मतदान केंद्र ताब्यात घेतल्याची बातमी आली होती.

तसेच यावेळी झालेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाल्याचीही माहिती होती. पण ही केवळ अफवा होती असा निर्वाळा स्पेशल टास्क फोर्सनं दिला आहे. (viral info circulating on social media about polling booths being gheraoed by naxals is wrong)

नक्षलवादी पळून गेले

एसटीएफच्या माहितीनुसार, ओरछा पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. गोळीबारानंतर संबंधित नक्षलवादी घटनास्थळावरुन पळून गेले. या हल्ल्यामध्ये एसटीएफचे जवान सुरक्षित असून कोणीही जखमी झालेलं नाही. हल्ल्याच्या भागात सर्च ऑपरेशन सुरु आहे. (Latest Marathi News)

केंद्र ताब्यात घेतल्याची व्हायरल माहिती खोटी

दरम्यान, सोशल मीडियावर जी माहिती व्हायरल झाली होती की, नक्षलवाद्यांनी एक मतदान केंद्र ताब्यात घेतलं असून तिथं गोंधळ माजला आहे. पण ही माहिती खोटी असून असं काहीही झालेलं नाही तसेच या ठिकाणी मतदानही सुरु आहे, अशी माहिती एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Marathi Tajya Batmya)

पहिल्या टप्प्यात २० जागांवर मतदान

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज 20 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 25 महिलांसह एकूण 223 उमेदवार रिंगणात आहेत. ज्यांच्यासाठी एकूण 40,78,681 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

पहिल्या टप्प्यासाठी 5,304 निवडणूक केंद्रे तयार करण्यात आली असून 25,249 मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT