mla paswan esakal
देश

'मी जिवंत आहे हो' अखेर आमदारांनी केला खुलासा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आजकाल सोशल मीडियावर (Social Media) लोकं काय पोस्ट करतील याचा नेम नाही. आणि तीच पोस्ट व्हायरल व्हायला क्षणाचाही वेळ लागत नाही. कारण सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही अनेक आहेत. एखाद्या गोष्टीला त्वरित प्रसिध्दी द्यायची असेल तर लोकं आता सोशल मिडियाला जास्त महत्व देतात. असाच एक दुर्दैवी प्रकार एका आमदाराबाबत घडला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची मोठी चर्चा होत आहे. काय घडले नेमके वाचा...

ती बातमी चक्क एका जिवंत आमदाराबाबत...

सोशल मीडियाच्या प्रसिध्दीचा परिणाम एका आमदाराला सहन करावा लागतोय. एका निधनाची खोटी बातमी (wrong news of MLA death) चक्क सोशल मीडियावर पसरली. आणि ती बातमी चक्क एका जिवंत आमदाराबाबत होती. बिहारमधील विद्यमान आमदार मुसाफिर पासवान (MLA Musafir Paswan) यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या सोशल मीडियाद्वारे प्रसारित झाल्यानंतर 'अरे अजून मी जिवंत आहे' असा खुलासा त्यांना सोशल मीडियाद्वारे केला आहे. जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी पसरली तेव्हा त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या कुटुंबीयांना शोक संवेदनांचे फोन करायला सुरूवात केली. या बातम्या तेव्हा आल्या जेव्हा ते मागील काही काळापासून ते सातत्याने आजारी होते. आणि एका रूग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे लोकांचा गैरसमज झाला असावा असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर अचानक त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूच्या बातम्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

'अजून मी जिवंत आहे.

निधनाची बातमी कळताच लोकांनी थेट त्यांच्या वैयक्तीक फोनवर कॉल करायला सुरूवात केल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी तातडीने आपल्या समर्थकांना कळण्यासाठी सोशल मीडियावरून ''अजून मी जिवंत आहे. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवणे थांबवा,'' असं आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

Pankaja Munde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर आक्रोश, सरकार शेतकरी-पशु पालकांच्या पाठीशी

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT