viral video food delivery boy interfere in couple spat odisha
viral video food delivery boy interfere in couple spat odisha e sakal
देश

Viral Video : प्रेमी युगुलाच्या राड्यात अडकला डिलिव्हरी बॉय, तरुणीला मारहाण

सकाळ डिजिटल टीम

भुवनेश्वर : फूड डिलिव्हरी बॉयने प्रेयसी आणि प्रियकराच्या भांडणात हस्तक्षेप करत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. पण, प्रेयसीने त्यालाच शिवीगाळ केली. त्यामुळे राग अनावर झालेल्या डिलिव्हरी बॉयने प्रियकरासमोरच प्रेयसीला मारहाण केली. ही घटना ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये (Bhubaneswar Odisha) घडली असून सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

ओडिशातील इंदिरा गांधी पार्कमधून बाहेर पडल्यानंतर तरुणीचा तिच्या प्रियकरासोबत जोरदार वाद झाला. व्हिडिओमध्ये ती तिच्या प्रियकराला शिवीगाळ करताना दिसतेय. तसेत त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न देखील केला. इतकंच नाहीतर प्रियकरावर दडगफेक केली. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी त्यांचा वाद आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर तरुणी आणखी चिडली आणि घटनास्थळावरील लोकांचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान डिलिव्हरी बॉयने हस्तक्षेप करून भांडण करणाऱ्या जोडप्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलगी आणखी चिडली आणि तिने अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. त्याला शिवीगाळ केल्यानंतर तो देखील संतापला. तरुणी प्रियकराला बाजूला करून डिलिव्हरी बॉयसोबत भांडण बसली. शेवटी राग अनावर झाल्याने डिलिव्हरी बॉयने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये तो तिला धक्काबुक्की करताना दिसत आहे. त्यानंतर घटनास्थळावरील लोकांनी हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. याबाबत कोणीही अद्यापही पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. पण, भुवनेश्वर पोलिसांनी स्वतः दखल घेतली असून दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केल्यामुळे तपास अधिकाऱ्याला दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असं भुवनेश्वरचे पोलिस अधिकारी उमाशंकर दास म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT