School Sakal
देश

Video Viral : मास्तर भिजतात पोरंही भिजतात, गळक्या वर्गातच भरते शाळा

पोरांना चक्क छत्र्या उघडून वर्गात बसावं लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : मध्यप्रदेशमधी सिवनी जिल्ह्यातील एका आदिवासी पाड्यातील शाळेचं छत गळायला लागल्यामुळे विद्यार्थ्यांना छत्र्या उघडून अभ्यास करावा लागत आहे. सिवनी जिल्ह्यातील खैरीकला गावातील हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

मध्यप्रदेशमधील या व्हिडिओमुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर टीका होत आहे. मुख्यमंत्री आपल्या मुलांना शिकवण्यासाठी परदेशात पाठवतात पण येथील शाळेतील विद्यार्थ्यांची ही अवस्था अशी आहे असं म्हणत नेटकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

सिवनी जिल्ह्यातील खैरीकला गावातील सरकारी शाळेतील प्रकार असून Tribal Army या नावाने असलेल्या एका ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर समाजातील दुर्बल घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचत नसून अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मध्यप्रदेशचा शैक्षणिक यादीत पाचवा क्रमांक लागतो पण काही भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा सामाना करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT