Viral Video of violent fight between student and Principal  Esakal
देश

MP School Video: अरे चाललंय काय? मुख्याध्यापिकेची विद्यार्थ्यासोबत जोरदार हाणामारी, 2.15 सेकंदात काय काय घडलं?

Viral MP School Video: विद्यार्थ्याने स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात मुख्याध्यापकांना ढकलून दिले. पुढे त्याने मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापिकेच्या कानशीलातही लगावल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले.

आशुतोष मसगौंडे

ग्वाल्हेरच्या खाजगी शाळेच्या मुख्याध्यापक आणि अकरावीच्या विद्यार्थ्यामध्ये झालेल्या हाणामारीचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे.

हे प्रकरण मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर जिल्ह्यातील हाजिरा भागातील असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांच मिल परिसरातील सीबीएस शाळेत ही घटना घडली.

ध्रुव आर्य हा इयत्ता 11वीत नापास झाल्यानंतर त्याचे ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC) घेण्यासाठी शाळेत गेला होता. मात्र, ध्रुव आणि मुख्याध्यापिका निशा सेंगर यांच्यात फी न भरण्यावरून वाद झाला. ध्रुवने दावा केला त्याने सर्व बाकी राहिलेली फी भरली आहे, तर मुख्याध्यापिका म्हणाल्या की, फी न भरल्यामुळे विद्यार्थ्याला टीसी देणार नाही.

मुख्याध्यापिकेने फी भरल्याशिवाय टीसी देणार नाही म्हटल्यावर विद्यार्थी आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. त्यानंतर मुख्याध्यापिका निशा सेंगर यांनी ध्रुवला मारहाण केली. यानंतर उपप्राचार्य राकेश सिंह आणि रजनी नावाच्या आणखी एका शिक्षिकेनेही विद्यार्थ्याला मारहाण सुरू केली.

यानंतर विद्यार्थ्याने स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात मुख्याध्यापकांना ढकलून दिले. पुढे त्याने मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापिकेच्या कानशीलातही लगावल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले.

या मारहाणीत विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर, मानेला आणि डोक्याला जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान मुख्याध्यापिकेला कोणतीही दुखापत झाली नाही. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी हजीरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि शिक्षकाविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापकआणि शिक्षिकेविरुद्ध एससी/एसटी प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, ध्रुववर धमकी आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. मात्र, ध्रुवने फी भरली होती की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT