Viral Video Esakal
देश

Viral Video: आरारारा खतरनाक! कार गरागरा फिरली अन् ड्रायव्हर थेट आकाशात; रोहित शेट्टीचा चित्रपटही ठरेल फेल

Viral Video Speeding Car: व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क होत आहेत. कारण, रोहित शेट्टीच्या चित्रपटात दाखवलं जातं तशाच प्रकारचा हा अपघात आहे.

कार्तिक पुजारी

Dramatic video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कुवेतमधील अबु अल हसानिया बिचवरील अपघाताचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये एक कार बिचवर सुसाट वेगाळे जाताना दिसत आहे. अचानक कार पलटी होते आणि चार-पाचवेळा गोलगोल फिरते. त्याचवेळी कारचा ड्रायव्हर गाडीतून बाहेर फेकला जातो.(Viral Video Speeding Car Flips Multiple Times Throws Driver In Air)

व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क होत आहेत. कारण, रोहित शेट्टीच्या चित्रपटात दाखवलं जातं तशाच प्रकारचा हा अपघात आहे. कार अचानक नियंत्रणाबाहेर जाते आणि गरागरा फिरायला लागते. त्याचवेळी ड्रायव्हर कारच्या बाहेर फेकला जातो. सुदैवाने चालक पाण्यामध्ये पडतो. त्यामुळे त्याला जास्त दु:खापत होत नाही. पण, रस्त्याच्या ठिकाणी असा अपघात झाला असता तर काहीतरी वाईट घडलं असतं हे नक्की.(Dramatic Visuals Captured On Camera)

माहितीनुसार, मुबारक-एल-कबीर प्रांतातील हा व्हिडिओ आहे. ३४ वर्षीय ड्रायव्हर बिचच्या बाजूने कार चालवत होता. पण, त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. कारच्या अपघातानंतर ड्रायव्हर अडखळत चालताना दिसत आहे. कारचा पार चेंदामेंदा झाला आहे. घटनेच्या वेळी एक व्यक्ती त्याच ठिकाणी उभा होता. सुदैवाने त्याला धोक्याचा इशारा मिळाला आणि त्याने तेथून पळ काढला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT