Viral Video of Dog working in Five Star Hotel
Viral Video of Dog working in Five Star Hotel Sakal
देश

Viral Video: चक्क 5 स्टार हॉटेलमध्ये काम करतो 'हा' कुत्रा; दर महिन्याला मिळतो खास पगार

सकाळ डिजिटल टीम

Viral Video of Dog: अलीकडच्या काळात नोकरी मिळणं खूप कठीण झालंय. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी लोकांना मिळेल ते काम करावं लागत आहे. अनेक लोक चांगला पगार मिळण्यासाठी रात्रंदिवस काम करतात, मग कुठेतरी त्यांना समाधानकारक पगार मिळतो. जगभरात अशी परिस्थिती असतानाच एका कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बंगळुरूचा आहे, या व्हिडीओमध्ये एक गोंडस कुत्रा एका 5 स्टार हॉटेलमध्ये (Five Star Hotel) काम करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यालाही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे चांगला पगार मिळतो. पगाराच्या रूपात त्याला सर्वांचे भरभरून प्रेम मिळते. वास्तविक, व्हिडिओमध्ये दिसणार्‍या या गोंडस कुत्र्याला छत किंवा जागा नव्हती. या कुत्र्याला बंगळुरूमधील एका पंचतारांकित हॉटेलने आश्रय दिला होता. यासोबतच त्याला 'बर्नी द ललित अशोक' असे गोंडस नावही दिले. (Dog works in a 5 star hotel, gets a special salary every month!)

व्हिडिओमध्ये बर्नी द ललित अशोकच्या गळ्यात एक ओळखपत्र दिसत आहे. हॉटेलने या डॉगीला 'चीफ हॅपीनेस ऑफिसर' या पदावर ठेवले आहे. इतर कर्मचार्‍यांप्रमाणे तो आता लॉबी मीटिंगला जातो, मसाजची मागणी करतो आणि इतर अनेक गोष्टी करतो. हॉटेलच्या जनरल मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकजण पगार म्हणून बर्नी द ललित अशोकला मिठी मारतो आणि खूप प्रेम करतो.

'बर्नी द ललित अशोक' हा क्यूट डॉगी पाहुणे आणि कर्मचाऱ्यांना खूश ठेवण्याचे काम करतो, यासह, हॉटेलमध्ये राहणारे लोक त्याच्यासोबत फिरतात, जेवण करतात आणि हँग आउट करू शकतात.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'thelalitbangalore' नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. इंटरनेट युजर्स हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला आणि शेअर केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT