Amritpal Singh 
देश

Amritpal Singh: अमृतपाल महाराष्ट्रात ड्रग्स पेडलर्सच्या आश्रयाला? गुप्तचर यंत्रणांच्या हाती धागेदोरे

सकाळ डिजिटल टीम

Latest Marathi News: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह महाराष्ट्रात आश्रयाला आल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत. मागील अनेक दिवासंपासून अमृतपाल सिंहचा पंजाब पोलीस शोध घेत आहेत.

गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांचं म्हणणं आहे की, आतंकी हरविंदर सिंह रिंदा याच्यासोबत अमृतपालचे संबंध आहेत. पंजाबपासून महाराष्ट्रापर्यंत रिंदाचं तगडं नेटवर्क आहे. अमृतपालने अशा प्रसंगासाठीच रिंदासोबत संबंध अबाधित ठेवल्याची माहिती आहे.

खलिस्तानची मागणी करणारा पंजाबचा कट्टरपंथी अमृतपाल महाराष्ट्रातील ड्रग्स पेडलर्सच्या आश्रयाला आल्याची माहिती आहे. 'अमर उजाला'ने याबाबतचे वृत्त सूत्रांच्या हवल्याने दिले आहे. अमृतपालचे संबंध, त्याचं नेटवर्क आणि इतर माध्यमांमधून गुप्तचर यंत्रणांना लिंक मिळत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार आयएसआय हँडलरच्या माध्यमातून तो महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे. पाकिस्तानच्या इशाऱ्यावर देशात ड्रग्सचा धंदा करणाऱ्या लोकांच्या आश्रयाला अमृतपाल असल्याची माहिती मिळतेय.

सध्या गुप्तचर यंत्रणांनी महाराष्ट्र, नांदेड ते मुंबईपर्यंत आपली यंत्रणा कामाला लावली आहे. पाकिस्तानमधून सूत्र हलवणाऱ्या आणि देशात ड्रग्स सप्लाय करणाऱ्या हरिवंदर सिंह रिंदा याची अमृतपालला मदत होत असल्याची माहिती आहे. या माहितीला पुष्टी मिळालेली नाही. मात्र तो पंजाबमधून महाराष्ट्राकडे गेल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT