Manmohan Singh 
देश

मी शांत होतो.. घाबरट नव्हतो! मनमोहनसिंग यांचा मोदींवर वार!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोक जरी मला सायलेंट पीएम असे म्हणत असले तरी मी त्यांच्यासारखा घाबरट नव्हतो. मी कधीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळून जात नव्हतो, अशी बोचरी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. मात्र, या परिषदेत मोदींनी एकाही पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. अमित शहा यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. विरोधकांकडून या परिषदेतील मोदींच्या वागण्यावरून जोरदार टीका करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर अभिनंदन मोदीजी, सुंदर पत्रकार परिषद अशी टीका केली.

चेंजिंग इंडिया या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना मनमोहनसिंग यांनी मोदींवर वार करत म्हटले, की नागरिक म्हणतात मी सायलेंट पीएम आहे. या पुस्तकातून मी व्यक्तिमत्व तुम्हाला कळेल. पत्रकारांच्या प्रश्नांपासून पळून जाणारा मी पंतप्रधान नव्हे. पत्रकारांशी मी सतत संवाद साधत होतो. प्रत्येक परदेश दौऱ्यानंतर मी दौऱ्याविषयी माहिती देत असे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 06 सप्टेंबर 2026

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT