Rahul Gandhi 
देश

Wayanad Lok Sabha 2024 Result: राहुल गांधी वायनाड, रायबरेलीत विजयाच्या दिशेने! जवळपास 1 लाख मतांची आघाडी

Wayanad Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी रायबरेलीतून ७२ हजार मतांनी आघाडीवर आहेत, तर वायडानमध्ये ते जवळपास १ लाख मतांनी आघाडीवर आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या दोन्ही मतदारसंघामध्ये राहुल गांधी यांनी मोठी आघाडी घेतली आहे. सध्याच्या कलानुसार, राहुल गांधी यांनी रायबरेलीतून ७२ हजार मतांनी आघाडीवर आहेत, तर वायडानमध्ये ते जवळपास १ लाख मतांनी आघाडीवर आहेत.

रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सोनिया गांधी २००४ पासून याच मतदारसंघातून खासदार राहिल्या आहेत. पण, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी यावेळी माघार घेतली अन् राहुल गांधी यांना संधी दिली. राहुल गांधी यांचा मागील निवडणुकीमध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. त्यांना स्मृती इराणी यांनी धक्का दिला होता. यावेळी रायबरेलीतून राहुल यांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्यासमोर भाजपने दिनेश प्रताप सिंह यांना तिकीट दिले आहेत.

वायनाड लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित मानला जातो. राहुल गांधी यांचा मागील लोकसभा निवडणुकीत जवळपास अडीच लाख मतांनी विजय झाला होता. त्यांना जवळपास साडेपाच लाख मतं मिळाली होती. यावेळीही राहुल गांधी मोठी आघाडी घेत असल्याचं दिसत आहे. वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्यासमोर भाजपचे के सुरेंद्रन आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या एनी राजा यांचे आव्हान होते.

लोकसभा निवडणुकीचा देशातील कल पाहता भाजप ४०० पार जाणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे. भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला ३०० जागा मिळवण्यास परिश्रम करावे लागत आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. इंडिया आघाडीने सध्या २०० चा आकडा पार केला आहे. दुसरीकडे, काँग्रेसने मोठी मुसंडी मारली असून पक्षाला तीन अंकी जागा मिळताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT